Thursday, April 25, 2024

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोच्या चेहऱ्यावर परतले हसू, उपचारासाठी जाणार ‘या’ ठिकाणी

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदोचा (Sahdev Dirdo) अपघात झाल्यापासून चाहते त्याच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत आहेत. चाहत्यांच्या या प्रार्थनांना यश मिळाले आहे. अपघातानंतर तासभर बेशुद्ध राहिल्यानंतर सहदेव शुद्धीवर आला. सहदेवच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आता या छोट्या स्टारच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतायला लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरून शबरी नगरला जात होता. यादरम्यान त्यांची दुचाकी रस्त्यावरच अनियंत्रित झाली. या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

रायपूरमध्ये केले जाणार आहेत वैद्यकीय उपचार
सहदेवला रात्री उशिरा जगदलपूर येथील डिमरपाल रुग्णालयात दाखल केल्यानंतरच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, सुकमा जिल्हा रुग्णालयातच सहदेवच्या डोक्याला ५ टाके घालण्यात आले. दुसरीकडे जगदलपूरच्या डिमरपाल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅननंतर सहदेवला १२ तास आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. सहदेव आता ठीक असून, तो बोलतही आहे. त्याच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. नातेवाइकांच्या विनंतीनंतर सहदेवला अधिक उपचारासाठी रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे. सध्या सहदेवचा जीव धोक्याबाहेर आहे.

सुधारतेय सहदेवची तब्येत
डिमरापाल रुग्णालयाचे अधीक्षक टिकू सिन्हा यांनी माहिती देताना सांगितले की, सहदेव यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. आता तो त्याच्या कुटुंबीयांशीही बोलत आहे. सिटी स्कॅन अहवालातही कोणतीही गंभीर दुखापत नाही. मात्र, डिमरापाल रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने सहदेवला कुटुंबीयांच्या विनंतीनंतर रायपूरला पाठवण्यात येत आहे.

तेथे पुन्हा एकदा त्याचे सिटी स्कॅन केले जाणार आहे. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सांगितले की, रात्री उशिरापासून सहदेवला आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र आता त्याची प्रकृती सामान्य असून, त्याला रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे. हॉस्पिटलमधून सहदेवचे अनेक फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमधली सहदेवची दुखापत पाहून तुमचेही हृदय तुटेल. आपल्या आवडत्या स्टारला असे जखमी पाहून कोणीही अस्वस्थ होईल.

हेही वाचा :

हे देखील वाचा