Friday, March 29, 2024

धक्कादायक! ‘बचपन का प्यार’ गाण्याने सर्वांची मने जिंकणाऱ्या सहदेवचा भयानक अपघात, डोक्याला गंभीर दुखापत

‘बचपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगढ़ी मुलगा सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) मंगळवारी (२८ डिसेंबर) एका रस्ता अपघातात जखमी झाला आहे. त्याचा शबरीनगर येथे अपघात झाला. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता
मिळालेल्या माहितीनुसार, सहदेव वडिलांसोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होता. दुचाकीवर तीन जण होते. सहदेव मागे बसला होता. ते शबरीनगरजवळ पोहोचले असता दुचाकी स्लीप झाली आणि सर्वजण खाली पडले. या अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहदेवला तातडीने सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याला जगदलपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सहदेवच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुकमाचे जिल्हाधिकारी आणि एसपीही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. (bachpan ka pyar fame sahdev chhattisgarh road accident head injury)

बादशाहने बनवले होते रिमिक्स
छत्तीसगडमधील सहदेवचे ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. नक्षलग्रस्त भागातील पेंडलनार शाळेत पाचवीत शिकत असताना २६ जानेवारीच्या तयारीदरम्यान सहदेवने हे गाणे गायले होते. त्याने शाळेत गायलेल्या या गाण्यावर अनेकांनी रील्स बनवले आहेत. प्रसिद्ध रॅपर बादशाहनेही सहदेवच्या या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन तयार केले आहे. या व्हिडिओत सहदेवही बादशाहसोबत दिसला. याशिवाय सहदेवच्या या गाण्यावर अनेक सेलेब्सनी इंस्टाग्राम रिल्स तयार केले आहेत.

बऱ्याचदा दिसलाय सीएमसोबत
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासोबतही तो अनेक वेळा दिसला आहे, यावरून सहदेवच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबतचा सहदेवचा एक व्हिडिओही खूप गाजला. या व्हिडिओमध्ये सहदेव म्हणतो की, ‘छत्तीसगडचे दोन लोक प्रसिद्ध आहेत. ‘एक हमर कक्का और एक हम.‘ तसेच दुसरीकडे या अपघातामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले असून, तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा