Sunday, January 26, 2025
Home अन्य भाऊ मस्तच ना! ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नवीन गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

भाऊ मस्तच ना! ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवचं नवीन गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

‘बचपन का प्यार’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल. हे गाणे इंटरनेट सेंसेशन सहदेव दिरडोने गायले होते. सहदेवचे गाणे इतके व्हायरल झाले की, मोठे स्टार्स देखील हे गाणे गुणगुणत होते. या एका गाण्यामुळे सहदेवला अनेक मोठ्या व्यासपीठांवर गाण्याची संधीही मिळाली. पुन्हा एकदा तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. मात्र, यावेळी तो ‘बचपन का प्यार’मुळे नाही, तर त्याचे नवीन गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आला आहे.

त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सहदेवने ‘बेला चाओ बेला चाओ’ गाणे गायले आहे. सहदेवचे हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सहदेव नेटफ्लिक्सची लोकप्रिय सीरिज ‘मनी हाईस्ट’चे शीर्षकगीत ‘बेला चाओ’ गात आहे. जे चाहत्यांना खूप आवडत आहे आणि सहदेवची जोरदार स्तुती करत आहेत. त्याचवेळी, पुन्हा एकदा सहदेवचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘बचपन का प्यार’मुळे बनला स्टार
सहदेवने प्रथम ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. त्याने छत्तीसगडच्या एका छोट्या गावात त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात हे गाणे गायले होते. जे त्याच्या शिक्षकांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. काही महिन्यांनंतर हे गाणे व्हायरल झाले आणि चाहत्यांच्या ओठांवर गुणगुणू लागले. अगदी रॅपर बादशाहने सहदेवसोबत एक गाणे रेकॉर्ड केले होते. एवढेच नाही, तर सहदेवला ‘इंडियन आयडल १२’मध्ये पाहुणा म्हणूनही बोलावण्यात आले होते. इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांनी या गाण्यावर त्यांच्या डान्स मूव्हज शेअर केल्या आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री सुद्धा सहदेवला भेटले आणि त्यांनी त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिला.

सरकारी शाळेत उभे राहून ‘बचपन का प्यार’ गाणारा सहदेव आज जगभरात प्रसिद्ध झाला आहे. चाहत्यांना त्याचे गाणे खूप आवडले आहे आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छाही आहे. ‘बचपन का प्यार’ गाणे गाऊन सहदेवचे आयुष्य बदलले आणि तो एका रात्रीत स्टार बनला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: कितीही व्यस्त स्केड्युल असले, तरीही आईसोबत वेळ घालवणे विसरत नव्हता ‘खिलाडी’ अक्षय कुमार

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा