Tiger Shroff | अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अलीकडेच, अभिनेता नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ शोमध्ये तो दिसला होता. यामध्ये तो शोच्या होस्ट नेहाशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसला.
‘नो फिल्टर नेहा’ शो दरम्यान, शोची होस्ट नेहाने टायगरला विचारले की, त्याचे चित्रपट अयशस्वी झाल्यावर तो काय करतो? या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेता म्हणाला, “मी बहुतेक ॲक्शन चित्रपट केले आहेत. ॲक्शनपट बनवताना एक अभिनेता शारीरिक आणि मानसिक तणावातून जातो आणि जेव्हा एवढ्या मेहनतीनंतरही चित्रपट फ्लॉप होतात, तेव्हा मी स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो. मी ॲक्शन चित्रपट करण्यास सक्षम आहे की नाही असा प्रश्न मला पडू लागतो. मी माझ्या क्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात करतो.”
टायगर आपले बोलणे चालू ठेवतो आणि म्हणतो, “जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा प्रत्येकाला आशा असते की तो चित्रपट हिट होईल, परंतु प्रत्येक वेळी ते शक्य नसते. माझा कोणताही चित्रपट जेव्हा अपयशी ठरतो, तेव्हा अनेकदा मी ते अपयश मनावर घेतो. आठवडाभर मी पुन्हा त्याच द्विधा मनस्थितीत गुंतून राहिलो, पण त्यानंतर मी त्या टप्प्यातून बाहेर पडून पुढच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली.”
आगामी काळात टायगर श्रॉफ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय टायगर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातही आपल्या ॲक्शनची जादू पसरवताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
Shahrukh Khan And Gauri Khan Lovestory | …म्हणून एका दिवसात शाहरुख आणि गौरीने केले होते 3 वेळा लग्न, झाला मोठा खुलासा
Vicky Kaushalच्या फोन वॉलपेपरवर दिसणारी ‘ती’ क्यूट मुलगी आहे तरी कोण?