Monday, April 15, 2024

Shahrukh Khan And Gauri Khan Lovestory | …म्हणून एका दिवसात शाहरुख आणि गौरीने केले होते 3 वेळा लग्न, झाला मोठा खुलासा

Shahrukh Khan And Gauri Khan Lovestory | अभिनेता शाहरुख खान (Shahrukh khan) आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे झाली आहेत आणि आजही त्यांची जोडी बॉलिवूडमध्ये एक आदर्श पती-पत्नी जोडी मानली जाते. अलीकडेच शाहरुखचा जवळचा मित्र अभिनेता विवेक वासवानी याने शाहरुख आणि गौरीच्या प्रेमकथेबद्दल अनेक रंजक खुलासे केले आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांना माहीत आहे, पण एक गोष्ट अशी आहे जी फक्त शाहरुखच्या जवळच्या मित्रांनाच माहीत आहे. शाहरुखसोबत सुरुवातीच्या काळात काम करणारा त्याचा जवळचा मित्र विवेक म्हणतो, ‘संपूर्ण जगाला शाहरुखची प्रेमकहाणी माहीत आहे, पण जगाला हे माहीत नाही की शाहरुखने गौरीशी एका दिवसात तीनदा लग्न केले.’

विवेक वासवानी आपले बोलणे चालू ठेवत म्हणतात, ‘लग्नापूर्वी शाहरुख आणि गौरी एकमेकांना ६ वर्षे डेट करत होते. शाहरुखसाठी गौरी हे त्याचे संपूर्ण जग होते. त्याचं गौरीवर इतकं प्रेम होतं की तो तिच्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होता. त्याच्या लग्नाच्या दिवशी मी त्याच्यासोबत तिथे उपस्थित होतो. शाहरुखने आधी कोर्ट मॅरेज, नंतर निकाह आणि शेवटी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. तो दिवस खूप रोमांचक होता. आम्ही सर्वजण शाहरुखसाठी खूप आनंदी होतो.

शाहरुख खानने करिअरच्या सुरुवातीच्या काळात गौरी खानसोबत लग्नगाठ बांधली होती. भूतकाळाची आठवण करून देत विवेक सांगतो, ‘लग्नानंतर लगेचच शाहरुखला शूटिंगसाठी बाहेर जावं लागलं. तेव्हा ते लगेच हनिमूनला गेले नाहीत. शूटिंगवरून परतल्यानंतर गौरीसोबत वेळ घालवण्यासाठी त्याने पाच दिवसांसाठी फाऊव्हस्टार हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Vicky Kaushalच्या फोन वॉलपेपरवर दिसणारी ‘ती’ क्यूट मुलगी आहे तरी कोण?
Deepika Padukone : 119 कोटींच्या घरात राहते दीपवीर जोडी; दोघांकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

हे देखील वाचा