Saturday, June 29, 2024

प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी जगायला शिकवणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज – व्हिडिओ

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला दिग्दर्शक केदार शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई – पियूष यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ( Baipan Bhari Deva Movie Trailer Released Watch Video )

“चित्रपटातील सहा अभिनेत्रींना एकत्रित पडद्यावर काम करताना पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असणार आहे. या सगळ्या अभिनेत्रींनी आतापर्यंत जे उत्तम काम अभिनयात केलंय ते खूप मोठं आहे. म्हणूनच मी देखील चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, लोकांना हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे.”असे अशोक सराफ म्हणाले आहेत.

हेही वाचा – मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं मोठ वक्तव्य, म्हणाले, “…म्हणुन मी नकार कळवतो”

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर आपापल्या आयुष्यात पूर्णपणे मग्न झालेल्या या सहा बहिणी मंगळागौर स्पर्धेनिमित्त एकत्र येतात. तेव्हा या सहाही बहिणींना एकमेकींच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची सुख-दु:ख कळतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या सहा बहिणी एकत्र येऊन कशा पद्धतीने मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात आणि त्याचसोबत वैवाहिक आयुष्याची कसरत कशा पद्धतीने करतात, याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे.

अधिक वाचा –
– शिल्पा शेट्टीचा ‘ताे’ बाेल्ड फाेटाे व्हायरल, अभिनेत्री राखी सावंत कमेंट करत म्हणाली…
– ‘आय लव यू’ म्हणत मितालीने सिद्धार्थ चांदेकरचा ‘तो’ फोटो केला शेअर; पहा फोटो

हे देखील वाचा