‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली कंगनाची नक्कल; चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया


सन २०१५ मध्ये बॉक्स ऑफिसवर एका चित्रपटाने अक्षरश: धमाल केली होती. तो चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील तिसऱ्या आणि बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्या चित्रपटाने तब्बल ९६९ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या चित्रपटाचे नाव ‘बजरंगी भाईजान’ आहे. यामध्ये सलमान खान आणि करीना कपूर खान या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. यामध्ये आणखी एक बालकलाकार होती, जिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. ती अभिनेत्री इतर कोणी नसून ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने हर्षालीला एका रात्रीत स्टार बनवले होते. तिच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. सध्या हर्षाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने आणखी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे. (Bajarangi Bhaijaan Actress Munni Aka Harshaali Malhotra Imitate Kangana Ranaut)

हर्षालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री कंगना रणौतची नक्कल करताना दिसत आहे. ती कंगनाच्या डायलॉगवर लिप सिंक करत आहे. कंगनाचा हा डायलॉग सध्या खूप ट्रेंडिंग आहे. यामध्ये ती म्हणते की, तिला वेले म्हणजेच चांगलं राहायला आवडते.

हर्षालीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. काही चाहत्यांनी तर या व्हिडिओला आतापर्यंतचा सर्वोत्तम व्हिडिओ म्हटले आहे. एका युजरने हर्षालीच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, “सेम हर्षाली मलाही हीच सवय आहे.”

हर्षालीच्या या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ४० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यापूर्वीही हर्षालीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती २०२१च्या स्थितीबद्दल बोलताना दिसली होती. या व्हिडिओत ती म्हणत होती की, “आपला प्रत्येक दिवस असा जगा, जसा तो शेवटचा आहे.”

हर्षालीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तसेच लाईक्स आणि कमेेंट्सचा अक्षरश: पाऊस पडत होता.


Leave A Reply

Your email address will not be published.