‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षालीचा नवीन व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘मुन्नी किती मोठी झालीय’


सन २०१५ साली सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा तुफान गाजला.  यातील अभिनय, गाणी, कथा या सर्वच बाजूंनी सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी झाला. या सर्वांसोबतच या चित्रपटातील एका कलाकाराने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ती व्यक्ती म्हणजे या सिनेमातील ‘मुन्नी’. मुन्नी अर्थातच हर्षाली मल्होत्राने या सिनेमात काम करत तिच्या निरागस आणि सोज्ज्वळ अभिनयाने रसिकांनी तिला डोक्यावर घेतले. या सिनेमामुळे हर्षालीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. चित्रपटाच्या वेळी केवळ सात वर्षांच्या हर्षालीने तिच्या प्रभावी अभिनयाने लोकांचे प्रेम मिळवले. सोबतच तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले.

नुकतेच १३ वर्षांच्या झालेल्या हर्षालीच्या लोकप्रियतेत कोणतीही कमतरता आली नाही किंबहुना तिच्या लोकप्रियतेत वाढच झाली आहे. सोशल मीडियावर हर्षालीला १ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहे. हर्षाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. नेहमी ती तिचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. हर्षालीने नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हर्षालीचा हा नवीन व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स संभ्रमात पडले आहेत. या व्हिडिओमध्ये एका रिंग लाईटच्या मागे असणाऱ्या हर्षालीची बोटे रिंग लाईटवर संगीताच्या तालावर थिरकताना दिसत असून, अचानक लाईटमागच्या बाजूला वळते आणि ग्लॅमरस अंदाजात हर्षालीचा चेहरा सर्वांसमोर येतो. तिने हा व्हिडिओ शेअर करत ‘टेक मी बेबी…,’ असे लिहिले आहे.

अतिशय छोटा असणारा हा व्हिडिओ खूप कमी काळात जास्त व्हायरल झाला आहे. शिवाय या व्हिडिओवर फॅन्सच्या कमेंट्स देखील यात असून, या कमेंट्समध्ये फॅन्सला बजरंगी भाईजान सिनेमातील हर्षाली आणि आताच्या हर्षालीमध्ये झालेला बदल सुखद वाटत आहे. या व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

काही फॅन्सने ‘मुन्नी आता किती मोठी झाली आहे?’ म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे. हर्षालीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला त्याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सोबतच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १ मिलियन फॉलोवर्स झाल्याचे देखील तिने सेलिब्रेशन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.