‘बालिका वधू’ या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये आनंदी ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीची 1 एप्रिल ही पुण्यतिथी असते. प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1 एप्रिल 2016रोजी तिने आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रत्युषाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला. तिच्या मृत्यूचे कारण प्रेमात झालेला विश्वासघात होता. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप नाराज होती.
प्रत्युषा बॅनर्जीचा (Pratyusha Banerjee) जन्म 10 ऑगस्ट 1991 रोजी सोनारी, जमशेदपूर येथे बंगाली कुटुंबात झाला. तिचे वडील शंकर बॅनर्जी स्वतःची एनजीओ चालवतात. मायानगरीत नशीब आजमावण्यासाठी प्रत्युषाने 2010 मध्ये जमशेदपूर सोडले. ती यशस्वी देखील झाली आणि तिने 2010 मध्ये ‘रक्त संबंध’ या टेलिव्हिजन शोमधून पदार्पण केले. यानंतर तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्येही काम केले होते, मात्र तिची ओळख ‘बालिका वधू’ने झाली.

प्रत्युषा ‘झलक दिखला जा 5’ आणि ‘बिग बॉस 7’ या रियॅलिटी शोमध्येही दिसली होती. तिने ‘ससुराल सिमर का’, ‘कॉमेडी क्लासेस’, ‘आहट’ आणि ‘सावधान इंडिया’मध्येही काम केले. सहा वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्युषाने मोठी कामगिरी केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 2016 मध्ये जेव्हा प्रत्युषाच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा तिच्या करिअरच्या उंचीवर पोहोचल्यानंतर ती आत्महत्या करू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

प्रत्युषा राहुल राजसोबत लग्न करणार होती आणि दोघे शेवटचे रियॅलिटी शो ‘पॉवर कपल’मध्ये एकत्र दिसले होते. प्रत्युषाच्या पालकांनी राहुलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. राहुलने याला नकार दिला आणि सांगितले की एक महिना विक्रम भट्टचा चित्रपट न मिळाल्याने ती तणावाखाली होती. मात्र, या आरोपांमुळे राहुलला कोठडीत राहावे लागले.

जेव्हा 2020 मध्ये कोरोना आला तेव्हा पुन्हा एकदा प्रत्युषाचे आई-वडील चर्चेत आले. खर तर, त्यावेळी ते इतक्या वाईट अवस्थेतून जात होते की, त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या पुण्यतिथीला पुष्पहार घालण्यासाठीही पैसे नव्हते. आजही प्रत्युषाच्या आई-वडिलांना आशा आहे की, आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल आणि आपल्या मुलीला न्याय मिळेल.
हेही वाचा –
–हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ मुळे हंसिका मोटवानी प्रकाशझोतात आली , बालपणीच वडिलांनी सोडले होते वा-यावर
–हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ मुळे हंसिका मोटवानी प्रकाशझोतात आली , बालपणीच वडिलांनी सोडले होते वा-यावर










