हिमेश रेशमियाच्या ‘सुरूर’ मुळे हंसिका मोटवानी प्रकाशझोतात आली , बालपणीच वडिलांनी सोडले होते वा-यावर

‘शका लका बुम बुम’, ‘कोई मिल गया’ मधून बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारी हंसिंंका मोटवानी आज ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घ्या तिच्याविषयी माहीत नसणाऱ्या काही रंजक गोष्टी…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी(Hansika Motwani) हिचा जन्म ९ ऑगस्ट १९९१ रोजी मुंबईत झाला होता. बालकलाकार म्हणून तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००० साली तिने ‘शका लका बुम बुम’मधून टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली होती. ९० च्या दशकात जन्मलेल्या अनेक तरुण-तरुणींची ती एक आवडती बालकलाकार होती. हंसिका २००१ मध्ये एकता कपूरच्या “देश में निकला होगा चांद” या मालिकेत दिसली होती. शका लका बुम बुम’ची ही चिमुरडी हंसिका आज ३२ वर्षांची झाली आहे. अनेक टेलिव्हिजन शो केल्यानंतर, हंसिकाने २००३ मध्ये हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हंसिकाने वयाच्या १५ व्या वर्षी साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे वळली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

अल्लू अर्जुनसह केला सुपरहिट सिनेमा
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या ‘देशमुदुरु’ या चित्रपटातून त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. माध्यांमाच्या वृत्तानुसार साधारण वर्षभर हा सिनेमा थिएटरमध्ये होता. ९ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने २० कोटींची कमाई केली. हंसिका मोटवानीला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी साऊथ फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. या सिनेमात तिने सुपरस्टार अल्लू अर्जुनसह स्क्रिन शेअर केली होती. आतापर्यंत हंसिकाने दक्षिणेतील जवळपास सर्व भाषांमध्ये जवळपास ५० चित्रपट केले आहेत.

या चित्रपटानंतर साऊथमध्ये हंसिकाची फॅन फॉलोइंग खूप वाढली आणि ती रातोरात सुपरस्टार बनली. यानंतर तिने साऊथमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. हंसिकाने हिमेश रेशमियासोबत ‘आपका सुरुर’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यावेळी हंसिकाचे वय अवघे १६ वर्षे होते.

लहान वयातच तिचे वडील तिला सोडून गेले होते
हंसिकाच्या वडिलांचे नाव प्रदीप मोटवानी असून ते मोठे उद्योगपती आहेत. हंसिका खूप लहान असताना तिच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट दिला, त्यानंतर तिच्या आईने हंसिकाला वाढवले. हंसिकाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, तिच्या आयुष्यात फक्त तिची आईच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

बॉलीवूडमध्ये काही विशेष घडले नाही
२००४ साली तिने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसह ‘जागो’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. हंसिका मोटवानी अखेरची बॉलिवूडमध्ये ‘मनी है तो हनी’ या चित्रपटामध्ये दिसली होती. हंसिका मोटवानीचा बॉलीवूडमध्ये विशेष काही प्रवास राहला नाही. त्यानंतर तिने पुन्हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आज ती साऊथच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

वादविवादात सुद्धा नाव आले होते
हंसिका मोटवानीचे नाव एकेकाळी मोठ्या वादात सापडले आहे. कोणीतरी तिचा बाथरूमचा एमएमएस लीक केला होता आणि हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आला होता. यावर हंसिकाने तिची प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, हे बलात्कारापेक्षा जास्त वेदनादायक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आधिक वाचा-

असे काय झाले की, तापसी पन्नूला थेट मीडियासमोर जोडावे लागले हात; व्हिडिओ व्हायरल

छोट्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी केला दिशा पटानीचा बाजार; म्हणाले, ‘आली बघा दुसरी उर्फी जावेद’

‘त्यांनी माझं मुस्काड फोडलं…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने उघडे पाडले महेश भट्ट यांचे पित

 

Latest Post