डिस्को किंग म्हणून प्रसिद्ध असलेले संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी आज आपल्यामध्ये असते तर त्यांचा 71वा वाढदिवस साजरा केला असता. बप्पी दा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बप्पी लहिरी हे त्यांच्या गायनाशिवाय त्यांच्या वेगळ्या शैलीसाठीही ओळखले जात होते. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. अनेकदा ते जड दागिने घालून घराबाहेर पडत असे. त्यांच्या गळ्यात हरे राम-हरे कृष्णाचे लॉकेट असायचे. मात्र याचे मागचे कारण तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणू घेऊया.
दागिने हा बप्पी दा (Bappi Da) यांच्या स्टाइलचा एक महत्त्वाचा भाग होता. बप्पी लहिरींनी इतका वेळ उलटून गेल्यावरही ही ओळख स्वतःपासून वेगळी का केली नाही, असा प्रश्नही अनेकवेळा सगळ्यांनाच पडत असे. याचे कारण खुद्द बप्पी लहिरी यांनीच माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. खरं तर, एका मुलाखतीदरम्यान त्यांना दागिन्यांच्या आवडीबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर गायक यांनी अतिशय साधेपणाने उत्तर दिले. “सोने माझा देव आहे” हे त्याचे पहिले उत्तर होते.
बप्पी दा म्हणाले होते, “सोने माझ्यासाठी लकी आहे. मी पहिल्यांदा हरे कृष्ण, हरे राम लॉकेट घातले. 1974 मध्ये ‘जख्मी’ने रौप्य महोत्सवी विजेतेपद पटकावले तेव्हा माझ्या आईने मला हे लॉकेट दिले होते. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते.” बप्पी दा यांनी पुढे सांगितले की,”लग्नानंतर ते बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते, तिथे त्यांनी लॉकेट परमेश्वराच्या चरणी ठेवले आणि नंतर ते गळ्यात घालायला सुरुवात केली.”
View this post on Instagram
याशिवाय बप्पी दा यांनी आणखी एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. गणेशजींचे लॉकेट घालण्याचे कारणही त्यांनी सांगितले. एका ठिकाणी गणपतीच्या मूर्तीमधून दूध निघत असल्याची बातमी आली तेव्हा त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. त्याचवेळी त्यांना स्वप्नात देव दिसला, त्यानंतर त्यांनी गळ्यात गणपती बाप्पाचे लॉकेट घातले. यानंतर बप्पी दा यांनी त्यांच्या बाकीच्या दागिन्यांची माहितीही दिली होती. बप्पी दा हनुमानजी आणि त्यांच्या गुरूंचे चित्र असलेले लॉकेट घालायचे. त्यांनी हे लॉकेट आपल्यासाठी भाग्यवान मानले होते.
हेही वाचा-
–विक्रम गोखले बनले होते विश्वसुंदरी ऐश्वर्याचे ‘वडील’, अभिनयाने गाजवली तब्बल 4 दशके
–विक्रम गोखले यांच्या कठीण काळात बिग बींनी दिलेली साथ, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिले होते पत्र