Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bappi Lahiri | कसे झाले बप्पी लहरी यांचे निधन? जावयाने सांगितला ‘त्या’ रात्रीचा पूर्ण घटनाक्रम

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक होते. आपल्या दमदार आवाजाने त्यांनी अनेक गाण्यांना लोकप्रिय केले. त्यांच्या आवाजाचे, गाण्यांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांवर आता शोककळा पसरली आहे.

बप्पी लहरी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या मुलांना आणि मुलीला हा धक्का सहन करणे अवघड झाले आहे. अवघ्या ६९व्या वर्षी बप्पी यांच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यांची मुलगी रीमा लहरीला तर आपल्या वडिलांच्या मृत्यूने खूपच मानसिक धक्का बसली आहे. आता बप्पी यांचे जावई गोविंद यांनी त्यांच्या मृत्यूबाबत संपूर्ण उलगडा केला आहे. मंगळवारी (१५ फेब्रुवारी) बप्पी लहरी यांना हृदय विकाराचा झटका आला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबद्दल बप्पी लहिरी यांच्या जावयांनी सांगितले की, “बप्पी दा अनेक दिवसापासुन रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्जसुद्धा मिळाला होता. ते घरी सुद्धा आले होते. सात साडेसातच्या दरम्यान त्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर अर्ध्याच तासाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.” याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, “आमच्या सर्वांसाठी हा खूप दुःखाचा क्षण आहे. बप्पी दाने संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्यावर सगळेच खूप प्रेम करत होते.”

बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन तबला वादक म्हणून काम केले आणि आपले पहिले याने वयाच्या चौदाव्या वर्षी गायले. त्यांच्या गळ्यातील सोन्याप्रमाणे त्यांची संपूर्ण कारकीर्द सुद्धा सोनेरी पर्व म्हणून ओळखली गेली. बप्पी दाने १९७७ मध्ये चित्रानीसोबत विवाह केला. त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच संगीतकार आहे तर मुलगा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. बप्पी लहरी यांच्या कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तिसरी पिढीसुद्धा संगीत क्षेत्रात उतरली आहे. त्यांचा नातू स्वास्तिकसुद्धा एक प्रसिद्ध रॅप सिंगर म्हणून ओळखला जातो. त्याने सुद्धा आपल्या आजोबांना आदर्श मानत संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे.

हेही वाचा

सोज्वळ ‘अंगूरी भाभी’ने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्वच मर्यादा, ही वेबसिरीज पाहून प्रेक्षकही झाले थक्क

‘ही’ अभिनेत्री देतेय रस्त्यावर तिला मिठी मारण्याची संधी, तुम्हीही गमावू नका Golden Chance!

आजही १२ वर्षांपूर्वीच्या चुकीची शिक्षा भोगतोय ‘बिग बॉस’चा विजेता; म्हणाला, ‘लोक मला…’

हे देखील वाचा