Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘राजनीती’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखा बिष्टने बंगाली चित्रपटसृष्टी देखील कमावले आहे नाव, जाणून घ्या माहिती

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अगदी मोजक्या चित्रपटात काम केले आहे. परंतु तरी देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. याच यादीतील एक अभिनेत्री म्हणजे बरखा बिष्ट. तिने बऱ्याच चित्रपटात तसेच टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करून तिचे नाव कमावले आहे. तिने केवळ हिंदीत नाही, तर बंगाली चित्रपटात देखील तिच्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे. अशातच बरखा सोमवारी (२८ डिसेंबर) रोजी तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

बरखाचा जन्म २८ डिसेंबर १९७९ मध्ये हिसार येथे झाला. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘कितनी मस्त है जिंदगी’ या मालिकेतून केली. परंतु तिला खरी ओळख स्टार प्लसवरील ‘प्यार के दो नाम’ या मालिकेतून मिळाली. या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजले होते. या मालिकेत बरखा मुख्य भूमिकेत होती. यासोबतच तिने ‘क्या होगा निम्मो का’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘काव्यांजली’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आणि इथूनच छोट्या पडद्यावरून तिला खरी ओळख मिळाली. (Barkha Bisht celebrate her birthday, let’s know about her life)

बरखाने टेलिव्हिजनवर नाव कमावल्यावर तिच्या अभिनयाची गाडी बॉलिवूडकडे वळवली. तिने ‘राजनीती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु या चित्रपटातून तिला काही खास यश मिळाले नाही आणि तिने बंगाली चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.

बरखाचे व्यावसायिक आयुष्य सगळ्यांना माहित आहे. परंतु ती तिच्या लव्ह लाईफमुळे देखील खूप चर्चेत राहिली आहे. तिने २००७ मध्ये अभिनेता इंद्रनील सेन गुप्तासोबत लग्न केले होते. त्यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी होती. त्यांची पहिली भेट ‘प्यार के दो नाम : एक राधा के शाम’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.

दोघांनी या मालिकेत एकत्र काम केले होते. या दरम्यान त्यांना एकमेकांना समजून घेण्याची आणि सोबत राहण्याची संधी मिळाली. त्यांनी जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केले. त्यांनी नंतर त्यांनी लग्न केले. परंतु लग्नाच्या १३ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

माध्यमातील वृत्तानुसार बरखा आणि इंद्रनीलचे नाते तुटण्यास बंगाली अभिनेत्री ईशा शाहा जबाबदार होती. बरखा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिची मुलगी मीरासोबत फोटो शेअर करत असते. यासोबत ती फिटनेस प्रेमी आहे. ती नेहमीच तिचे जिममधील फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

हेही वाचा :

फॅशनबाबत करण जोहर देतोय रणवीर सिंगला टक्कर, पॅराशूट ड्रेसमधील लूक आला समोर

शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू

‘आज भाई का बर्थडे है’, म्हणत जिनिलियाने दिल्या सलमान खानला खास अंदाजात शुभेच्छा 

 

हे देखील वाचा