शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू


सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर अभिनेत्री शहनाझ गील नेहमीच चर्चेत विषय बनली आहे. अशातच तिच्या कुटुंबामधून एक मोठी बातमी समोर आली आहे की, शहनाझ गिलच्या वडिलांना दोन लोकांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी दुचाकीवरून संतोख सिंग सुखवर फायरिंग केली होती. माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्रीचे वडील संतोख सिंग सुख एका कार्यक्रमात जाऊन अमृतसरच्या ब्याससाठी निघाले होते. त्यावेळी जंडीयाला गुरूजवळ एका ढाब्यावर ते थांबले होते.

हाती आलेल्या माहितीनुसार, शहनाझच्या वडिलांवर शनिवारी (२५ डिसेंबर) रोजी रात्री ८ च्या सुमारास गाडीवरून फायरिंग झाली होती. तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसांना सगळी माहिती दिली. तिच्या वडिलांचे असे म्हणणे होते की, त्यांनी लघुशंकेसाठी त्यांची गाडी थांबवली होती. तेव्हा दोन जन बाईकवरून आले आणि फायरिंग सुरू केली. (Shehnaaz gill father santokh Singh suk attacked 2 people in bike fired bullets)

या हमल्यात संतोख सिंग यांच्या गाडीला चार गोळ्या लागल्या आहेत. स्वतः ला वाचवण्यासाठी जेव्हा ते गाडी घेऊन निघाले, तेव्हा ते दोन लोक तेथून पळून गेले. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. सध्या पोलिसांची तपासणी चालू आहे.

सध्या पोलिसांना अनेकांना संशय आहे. शहनाझच्या वडिलांवर आधी अनेक क्रिमिनल केस चालू होत्या. त्यामुळे त्यांनी त्यांची सिक्युरिटी हटवली होती. सध्या पोलीस वेगवेगळ्या मार्गाने तपासणी करत आहेत. तिचे वडील काही दिवसांपूर्वी बीजेपी पार्टीमध्ये सामील झाले होते.

शहनाझ गिल सध्या तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर ती सदम्यात गेली होती. परंतु या सगळ्यातून बाहेर येऊन तिने नवीन सुरुवात केली आहे आणि ती तिच्या कामाकडे लक्षकेंद्रित करत आहे. ती मागील दिवसात काही म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे.

हेही वाचा :

मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी २०२१ मध्ये घेतला जगाचा निरोप

‘आज भाई का बर्थडे है’, म्हणत जिनिलियाने दिल्या सलमान खानला खास अंदाजात शुभेच्छा

घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य आले समोरासमोर, एकमेकांपासून नजर चोरत निघून जाणे केले पसंत

 


Latest Post

error: Content is protected !!