‘आज भाई का बर्थडे है’, म्हणत जिनिलियाने दिल्या सलमान खानला खास अंदाजात शुभेच्छा


बॉलिवूडमधील काही कलाकारांनी एकत्र काम केले नसले, तरी देखील ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. अशातच रविवारी (२७ डिसेंबर ) रोजी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर संपूर्ण बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुखने इंस्टाग्राम अकाऊंटवरून सलमान खानसोबत एक व्हिडिओ शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जिनिलीयाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, जिनिलिया आणि सलमान एकदम बिनधास्त अंदाजात डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ( genelia deshmukha share a video with Salman Khan and give him best wishes)

हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “विशाल हृदय असणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझे आयुष्य आनंदी आणि सुदृढ असो. आज भाई का बर्थडे आहे.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सलमान खान हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक चित्रपटात काम करून त्याने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याचा ‘अंतिम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच सलमान आता ‘बिग बॉस १५’ ला होस्ट करत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी सलमानला पनवेल येथील फार्म हाऊसवर साप चावला आहे. परंतु तो साप बिन विषारी होता. त्यामुळे सलमानवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याची तब्येत आता एकदम ठीक आहे.

हेही वाचा :

 परी करतीये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचा अभिनय, ओळखा पाहू कोण आहे तो? 

घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य आले समोरासमोर, एकमेकांपासून नजर चोरत निघून जाणे केले पसंत

ख्रिसमस पार्टीत पोहोचताच मलायका अरोराला तिच्या हाय हिल्सने दिला धोका, अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

 

 


Latest Post

error: Content is protected !!