फॅशनबाबत करण जोहर देतोय रणवीर सिंगला टक्कर, पॅराशूट ड्रेसमधील लूक आला समोर


बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहरला आपण नेहमीच वेगवेगळ्या पोशाखात पाहिले आहे. त्याचा हा अंदाज सगळ्यांना त्याच्याकडे आकर्षित करत असतो. असाच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो ओव्हर साईज ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याची मैत्रीण फराह खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. करण जोहरचा हा फॅशन सेन्स रणवीर सिंगप्रमाणे वेगळा आहे. परंतु फराह खान आणि त्याच्या सगळ्या चाहत्यांना या अंदाज खूप मजेशीर वाटत आहे.

फराह खानने जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये करण त्याच्या ड्रेसबाबत माहिती सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “हा ओव्हर साईज आहे. करण जोहर यात पॅराशूट घातलेला दिसत आहे. हाच व्हिडिओ जान्हवी कपूरने देखील आधी शेअर केला होता. (Karan Johar wearing parachute challenging ranveer singh in fashion)

फराहचा हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. त्यांचे चाहते आता हे जाणून घेऊ इच्छितात की, फराहने नक्की काय घातले आहे. एका चाहत्याने करणसाठी कमेंट केली आहे की, “तू पुन्हा एकदा करून दाखवले.” त्याच्या या व्हिडिओवर बाकी अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

फराह आणि करण खूप वर्षांपासून मित्र आहे. ते नेहमीच एकमेकांची मजा मस्ती करताना दिसतात. ते नेहमीच त्यांच्या डाएट आणि कपड्यांवरून मस्करी करत असतात. सोशल मीडियावर देखील व्हिडिओ शेअर करून मस्करी करत असतात. माध्यमातील वृत्तानुसार फराह आणि करण ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरने केले आहे. तसेच फराह खानने कोरीओ ग्राफ केली आहे. फराह नेहमीच चित्रपटाच्या सेटवरील व्हिडिओ शेअर करत असते. या चित्रपटाची शूटिंग सध्या दिल्लीमध्ये चालू आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच धर्मेंद्र आणि शबाना आजमी देखील या चित्रपटात आहेत.

हेही वाचा :

शहनाझ गिलच्या वडिलांवर झाला दुचाकीवरून हल्ला, पोलिसांनी केलीय कडक तपासणी सुरू

मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी २०२१ मध्ये घेतला जगाचा निरोप

सुहाना खानने फोटो शेअर करत फ्लॉन्ट केली त्वचा लिहिले, “डू नॉट…” 

 

 


Latest Post

error: Content is protected !!