बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्याबाबत आणि ड्रेस बाबत खूप काळजी घेत असतात. कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर सर्वात आधी त्या त्यांच्या लूकवर जास्त लक्ष देतात. त्यांचा ड्रेस त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी या सगळ्याचा त्या विचार करत असतात. पण कधी कधी त्यांच्या ड्रेसमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी एखादा ड्रेस लूज होत असतो तर कधी एखादा ड्रेस एवढा गच्च होतो की त्यांना बसायला देखील जमत नाही. अशीच फजिती उडाली आहे ती बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची.
उर्वशी रतौलाच्या फॅन पेजवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती कोणत्यातरी सेशनमध्ये बसलेली दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचा एक शॉर्ट वन पिस घातलेला आहे. तो ड्रेस तिला खूप गच्च होत आहे. ती उभी होती तेव्हा तिला काहीच वाटते नव्हते. पण जेव्हा ती खाली बसली तेव्हा तिला नीट बसता येत नव्हते. तिला एका पायावर दुसरा काय ठेवायला देखील अडचण येत होती. पण तिने ते सगळं सावरून घेतलं.
उर्वशीचा नुकतेच काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होता. या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करायला लागला होता. या फोटोमध्ये तिने संपूर्ण अंगाला चिखल लावला होता. तिने याला एक ब्युटी थेरपी म्हंटले होते. यावर युजरने तिची खिल्ली उडवली होती. तिचा हा फोटो पाहून युजरला अनिल कपूरच्यख ‘नायक’ या चित्रपटाची आठवण आली होती. त्यांनी तिला ‘नायक 2.0’ म्हणून ट्रोल केले होते.
उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले 2’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे 36 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला
-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज