×

नोहा फतेहीने विचित्र अंदाजात घातली बिकिनी; अभिनेत्रीला पाहून वरुण धवनही झाला लोटपोट

कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतात. पडद्यावर तर ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असतात. शिवाय सोशल मीडियावरूनही ते त्यांचे फोटो, व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असतात. कलाकार त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील लाईमलाईटमध्ये राहतात. काही अपवाद वगळता सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी घरी राहून त्यांचे वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ तयार केले होते. असे व्हिडिओ व्हायरल देखील खूप झाले आहेत.

अशीच एक सोशल मीडिया सेन्सेशन असलेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने तिचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नोराने बिकिनी घातलेला एक असा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून तुम्हालाही हसायला येईल.

नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने, सैलसर गुलाबी रंगाचे जॅकेट घातले आहे. तिच्या साईझपेक्षा बरेच मोठे जॅकेट तिने घातले आहे. हा व्हिडिओ चालू असताना मागून आवाज येतो की, प्रथम स्वतःला सैलसर कपड्यांमध्ये दाखवा आणि नंतर आवाज येतो की बिकिनी घाला. हा आवाज एकूण नोरा लगेच बिकिनी घालते. मात्र, या व्हिडिओमध्ये नोराचा बिकिनी अवतार जरा हटके आहे. तो तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच लक्षात येईल.

नोराने तिच्या सैल जॅकेटवरच बिकिनी घातली आहे. शिवाय डोळ्यांवर चष्मा देखील घातला. हा व्हिडिओ पोस्ट करत नोराने लिहिले, “स्वतः ला बिकिनीमध्ये दाखवत आहे.” नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिच्या फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

अभिनेता वरुण धवनने देखील नोराच्या या फनी व्हिडिओवर भन्नाट कमेंट केली आहे. वरुणने नोराच्या या व्हिडिओवर एक हसणारा इमोजी पोस्ट केला आहे. वरुण आणि नोराने ‘स्ट्रीट डांसर’ या चित्रपटात सोबत काम केले आहे.

नोराने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध गाण्यांवर डान्स केला आहे. नोराची सर्वच गाणी सुपरहिट झाली आहेत. नोराने काही दिवसांपूर्वीच तिच्या आंतराराष्ट्रीय फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नीना गुप्ता यांनी करिअरच्या सुरुवातीला केला होता कास्टिंग काऊचा सामना; ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितला त्या रात्रीचा किस्सा

-पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आईचे झाले अपहरण; संपत्तीच्या वादामुळे पंतप्रधानांकडे मागितली मदत

-सोनू कक्करही झाली ‘इंडियन आयडल १२’ मधील अरुणिताच्या आवाजाची दिवानी; दिली तिला ‘ही’ खास भेट

Latest Post