Friday, March 29, 2024

भयंकर! दहशतवाद्याकडून काश्मीरमध्ये अभिनेत्रीची गोळी घालून हत्या, सोबत १० वर्षांचा…

जम्मू-काश्मीरमधून कलाविश्वाला हादरा देणारी एक बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांकडून एक टेलिव्हिजन अभिनेत्रीची राहत्या घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये ही घटना घडली. ( Kashmiri TV actress Amreen Bhat killed by terrorists )

दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरीन भट यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. या हल्ल्यात अमरीन यांचा दहा वर्षांचा पुतण्या देखील गोळी लागल्याने जखमी झाला. बडगाम जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी, अभिनेत्री अमरीन आणि तिच्या दहा वर्षांच्या पुतण्यावर चादूरा येथील अमरीन भट यांच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात ते दोघे जखमी झालेत.

दरम्यान, या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमरीन भट यांना मृत घोषित केले. तर, त्यांच्या पुतण्यावर उपचार करण्यात येत आहे. १० वर्षांच्या पुतण्याच्या हातावर गोळी लागली आहे.

( kashmir television artist killed by terrorist in budgam of jammu and kashmir )

अधिक वाचा

मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज दाखवणार ‘वाय’, चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा

‘जेठालाल’ साकारण्यापूर्वी दिलीप जोशींनी ‘या’ चित्रपटात केलंय काम; प्रियांका चोप्राच्या चित्रपटाचाही आहे समावेश

अभिनेत्रीसोबत गैरव्यवहार करणे पोलिस कर्मचाऱ्याला पडले महागात, सुरू झाली अंतर्गत चौकशी

हे देखील वाचा