Monday, May 13, 2024

विद्युत जामवालचा विषयच खोल! रस्ता सोडून पठ्ठ्याने झाडावरच केले स्केटिंग, व्हिडिओ पाहाच

बॉलिवूडमध्ये दमदार आणि डॅशिंग अभिनेत्याबद्दल चर्चा होत असेल, तेव्हा त्यामध्ये विद्युत जामवाल याचे नाव आल्याशिवाय राहत नाही. विद्युत हा त्याच्या अस्सल अभिनयासोबतच खतरनाक स्टंटसाठीही ओळखला जातो. तो नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो झाडावर स्केटिंग करताना दिसत आहे. विद्युतचा हा व्हिडिओ पाहून कुणाचीही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.

विद्युत जामवाल याने केला खतरनाक स्टंट
जगभरातील सर्वोत्तम मार्शल आर्ट्स खेळाडूंमध्ये बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) याच्या नावाचाही समावेश होतो. विद्युत त्याच्या मार्शल आर्ट्सच्या कलेमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच विद्युतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम (Vidyut Jammwal Instagram) अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ‘खुदा हाफिज २’ फेम अभिनेता विद्युत झाडावर चढताना दिसत आहे. मात्र, झाडावर चढताना त्याने पायात स्केटिंग शूज (Vidyut Jammwal Skating Video) परिधान केले आहेत. त्याचा हा व्हिडिओ पाहून कोणीही हैराण होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

कारण, स्केटिंग परिधान करून लोकांना नीट चालताही येत नाही आणि विद्युत जामवाल ते परिधान करून झाडावर चढत आहे. या खतरनाक स्टंटचा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण विद्युतचा चाहता बनला आहे. सोबतच चाहते त्याच्या व्हिडिओची प्रशंसा करत आहेत. यामुळे विद्युतचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या सिनेमात झळकणार विद्युत जामवाल
दुसरीकडे विद्युत जामवाल याच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘खुदा हाफिज २’ (Khuda Haafiz: Chapter 2) सिनेमात तो झळकला होता. त्याच्या या सिनेमाला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली नाही. त्यामुळे ‘खुदा हाफिज २’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता आगामी काळात विद्युत शेर सिंग राणा याच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
मौनीने पतीचा वाढदिवस बनवला यादगार, अभिनेत्री बोटीतच झाली रोमँटिक; फोटो व्हायरल
सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’
विमानतळावर नेहा कक्करला पाहून चाहतीला कोसळले रडू; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हरऍक्टिंगचे ५० रुपये कट’

हे देखील वाचा