Saturday, July 6, 2024

‘केकेपेक्षा चांगलं तर आपण सगळे गाऊ शकतो…’, वादग्रस्त विधान करून अडचणीत सापडले रुपांकर बागची

प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ सेलिब्रिटीच नाही, तर सर्वसामान्य जनताही शोकग्रस्त आहे. केके हे इंडस्ट्रीतील एक दिग्गज गायक होते, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. केके यांच्या निधनाबद्दल सर्वजण श्रद्धांजली वाहत असतानाच, बंगाली गायक रुपांकर बागची (Rupankar Bagchi) यांनी गायक केकेबद्दल असे काही म्हटले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

कोलकाता येथील लाइव्ह कॉन्सर्टनंतर केके यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगाली गायक रुपांकर बागची यांनी केकेच्या कॉन्सर्टनंतर आणि मृत्यूच्या काही तासांपूर्वीच स्वतःचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रुपांकर दिवंगत गायकाबद्दल म्हणाले की, “त्याची गाणी ऐकल्यानंतर मला जाणवले की, आपण सगळेच केकेपेक्षा चांगले गाऊ शकतो. प्रचार म्हणजे काय? हा केके… केके… केके, कोण आहे केके? आपण कोणात्याही केकेपेक्षा चांगले आहोत.” (bengali singer rupankar bagchi trolled for controversial remark over singer kk)

विधानावर झाले ट्रोल
त्यानंतर आता रुपांकर बागची या व्हिडिओमध्ये दिलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. युजर्स रुपंकर यांना त्यांच्या विचारसरणीबद्दल कठोरपणे फटकारत आहेत. काही युजर्सनी तर ‘काही लाज बाळगा’ असे म्हटले आहेत.

त्याचवेळी सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल झाल्यानंतर बंगाली गायक केकेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ते म्हटले की, केकेबद्दलचे त्यांचे विधान चुकीचे मांडण्यात आले आहे. तसेच त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असेही त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा