Tuesday, July 9, 2024

काय!!! लवकरच ‘Good News’ देणार आहे ‘भाभीजी घर पर है’ची अंगुरी भाभी?

ऍंड टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो ‘भाभीजी घर पर है’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. हा शो दररोज प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन सादर करतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह वाढतच चालला आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. शोमध्ये लवकरच असा ट्विस्ट येणार आहे, जो प्रेक्षकांना चकित देणार आहे. सेटवरील एका सूत्राने उघड केले आहे की, आगामी कथेत अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) (Shubhangi Atre) गरोदर असेल, तर अंगूरी भाभीवर फिदा असणारा विभूती नारायण (आसिफ शेख) (Asif Sheikh) तिच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या कथेत अंगूरी भाभी तिवारी जीला सांगते की, ती गरोदर आहे आणि ही बातमी ऐकून तिवारी खूप खूश होतो. तसेच, यादरम्यान तिवारी जी अंगूरीला सांगतो की, त्याची इच्छा आहे की त्याचा एक मेहुणा असावा जो त्याचा व्यवसाय सांभाळेल. जेणेकरून तो अंगूरीसोबत अधिक वेळ घालवू शकेल. अंगूरीच्या गरोदरपणाची बातमी पसरताच, तिचे वडील भुरे लाल (राकेश बेदी) तिच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी येतात आणि संभाषणात ते उघड करतात की, अंगूरीला जट्टन नावाचा एक भाऊ होता, जो जन्मताच हरवला होता. दरम्यान, मिश्राच्या घरी एक दाई माँ, हेलन (प्रतिमा काझमी) म्हणजेच विभूतीच्या आईला सांगते की विभूती तिचा मुलगा नाही आणि दुर्दैवाने विभूतीला हे ऐकतो. (bhabiji ghar par hai shubhangi atre aka angoori will be pregnant soon in serial)

अंगूरीच्या डोहाळे जेवणामध्ये नाराज विभूती तिवारी जीचा अपमान करतो आणि तिवारी जी त्याला ढकलून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण भुरे म्हणजेच अंगूरीच्या वडिलांना विभूतीच्या मानेवर त्यांच्या कुटुंबाची खूण दिसते आणि ते असा दावा करतात की, विभूती त्यांचा हरवलेला मुलगा आहे. याबद्दल बोलताना शुभांगी अत्रे म्हणजेच अंगूरी भाभी म्हणाली, “हा सर्वात मजेदार आणि ट्विस्टसारखा सीक्वेन्स आहे. हे पाहून प्रेक्षक लोटपोट होतील.” अंगूरी ही त्याची बहीण आहे, हे विभूतीला कळल्यावर त्याचे तोंड पाहण्यासारखे असेल. पण हे खरे आहे की तिवारीने विभूतीला मेव्हणा बनवण्यासाठी आणखी एक कथा रचली आहे? आता नात्यांचं हे गूढ कसं उकलणार, हे एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतरच कळेल.

हे देखील वाचा