Thursday, February 22, 2024

‘भाबीजी घर पर हैं’ मधील ‘या’ अभिनेत्याने केले बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम, ‘या’ मालिकेने बदलवले आयुष्य

‘भाभीजी घर पर है’ मधील तिवारी जीची व्यक्तिरेखा अतिशय अनोखी आहे. आठवी पास झालेला माणूस अंडरवेयर आणि बनियान विकतो. घरात सुंदर बायको आहे, पण घरची कोंबडी डाळीप्रमाणे आहे, असे ते म्हणतात. या शोमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा असल्या, तरी त्यामागे रोहितेश गौड यांनी ‘तिवारी’ या व्यक्तिरेखेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज हे पात्र प्रत्येक घरात लोकांच्या मनात घर करून आहे. पण मनमोहन तिवारीच्या आधी रोहिताश यांच्या आयुष्यात मुकुंदीलालची व्यक्तिरेखा आली आणि याच शोने रोहितेश यांचे आयुष्य बदलण्यात भूमिका बजावली.

View this post on Instagram

 

A post shared by Rohitashv Gour (@rohitashvgour)


लपतागंजचा मुकुंदीलाल अशी खास ओळख

रोहिताश (Rohitash Gaud) यांना इंडस्ट्रीत दोन दशके उलटली असली तरी, २००९ मध्ये जेव्हा ते ‘लापतागंज’ (Laaptaganj) मालिकेत सामील झाले, तेव्हा त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. हा शो सर्वांना खूप आवडला आणि त्यांची लोकप्रियता देखील गगनाला भिडू लागली. ‘भाभीजी घर पर हैं’ (Bhabiji Ghar Par Hain) प्रमाणेच या शोची पात्रंही अनोखी होती आणि त्या अनोख्या पात्रांपैकी एक म्हणजे मुकुंदीलाल. ही भूमिका रोहितेश यांनी केली होती. ते इतके आवडले की, त्यांना यासाठी तीन पुरस्कार मिळाले आणि लवकरच त्यांचे आयुष्य बदलले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohitashv Gour (@rohitashvgour)


२००१ पासून अभिनय क्षेत्रात करिअरला झाली सुरुवात

अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन रोहितेश गौड खूप पूर्वी मुंबईत आले सुरुवातीला त्यांना हे स्वप्न गाठणे खूप कठीण वाटत होते. त्यांना सुरुवातीला छोट्या भूमिका करून काम करावे लागे. रोहितेश १२ बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत आणि त्यांचा पहिला चित्रपट २००१ मध्ये ‘वीर सावरकर’ होता. ज्यामध्ये त्यांनी वीर सावरकरांच्या भावाची भूमिका केली होती.

यानंतर ते ‘प्रथा’, ‘पिंजर’, ‘धूप’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘ए वेनसडे’, ‘३ इडियट्स’, ‘अतिथी तुम कब जाओगे’ आणि ‘पीके’मध्ये दिसले. भूमिका छोट्या असल्या, तरी रोहितेश यांनी त्या मनापासून साकारल्या. आजच्या ‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये मनमोहन तिवारी बनून रोहिताश प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा