सर्वांनी नुकताच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस, तसे पहिले तर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. मात्र, तरीही व्हॅलेंटाईन डे हा खूप वेगळा आणि स्पेशल दिवस असतो. हा दिवस सामान्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वांसाठीच वेगळा असतो. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सर्वांनीच सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यात कलाकार देखील मागे नव्हते.
भाग्यश्री पटवर्धनने देखील तिच्या नवऱ्याला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. भाग्यश्रीने सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ सिनेमातून हिंदी सिनेमामध्ये एन्ट्री केली होती. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. मात्र, भाग्यश्रीने या सिनेमानंतर लगेच हिमालय दासानीसोबत लग्न केले. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहते. तिला सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.
भाग्यश्री नेहमीच तिचे फोटो, व्यायामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कधी कधी ती तिच्या नवऱ्यासोबत देखील व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करते. यावेळेस तिने व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देणारा फोटो शेयर केला आहे. या फोटोत भाग्यश्रीने क्रॉपटॉप आणि डेनिम स्कर्ट घातला आहे.
त्यांच्या या फोटोला फॅन्सकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे. भाग्यश्रीने १९८७ साली ‘कच्ची धूप’ मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती ‘मैने प्यार किया’ या सिनेमातून. मागील काही दिवसांपासून अभिनयापासून लांब असणारी भाग्यश्री लवकरच कमबॅक करणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…