Saturday, February 22, 2025
Home मराठी ‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत

भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंद्वारे ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. तिच्या पोस्ट्स शेअर होता क्षणीच व्हायरल होऊ लागतात.

अलीकडेच भाग्यश्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात नेटकऱ्यांना तिची हॉट स्टाईल पाहायला मिळाली आहे. या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या लॉंग ड्रेसमध्ये दिसली आहे. तिने हा ऑफ शोल्डर ड्रेस अतिशय हॉट अंदाजात कॅरी केला आहे. याच तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. अभिनेत्रीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसून येत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला आता नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. जर तुम्ही फोटोखालचे कमेंट सेक्शन पाहिले, तर तुम्हाला ते लाल हार्ट आणि फायर ईमोजीने भरलेले दिसेल. काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत तब्बल १५ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मी माझ्या स्वप्नातली स्त्री आहे.” फोटोसोबतच हे कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अलीकडेच भाग्यश्रीने एक पोस्ट शेअर करत, चाहत्यांना सांगितले होते की, ती आता हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोरोना महामारीमुळे चित्रपटाची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचेही अभिनेत्री सांगितले.

भाग्यश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मानलं भावा तुला! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहत्याचा हैदराबाद ते मुंबई अनवाणी पायांनी प्रवास; सोनूनेही मानले आभार

-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

हे देखील वाचा