Monday, July 1, 2024

‘बाई वाड्यावर या…च्या पलीकडेही निळूभाऊ खुप शिल्लक आहेत…’, फुलेंच्या स्मृतीदिनानिमित्त भरत जाधवची हृदयस्पर्शी पोस्ट

‘बाई वाड्यावर या…’ हा डायलॉग ऐकला की डोळ्यासमोर येतात निळू फुले. रांगडे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या निळू फुलेंचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. खलनायक कसा असतो, हे त्यांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. त्यांचा अभिनय इतका उत्कृष्ट असायचा की, प्रेक्षकांना वाटायचं की निळू फुले खऱ्या आयुष्यातही क्रूर आहेत. त्यांनी तब्बल 4 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

या निळू फुलेंचा आज म्हणजेच 13 जुलैला स्मृतीदिन आहे. या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांना अभिवादन केलं आहे. त्यांच्या आठवणीत आज त्यांच्या अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यानेही फुलेंच्या स्मरणार्थ एक पोस्ट शेअर केली आहे, जिने सोशल मीडियावरील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं पाहायला मिळत आहे.

भरत जाधवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत निळू फुलेही दिसत आहेत. फुले खुर्चीवर बसले आहेत, तर भरत त्यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून, भरतने अतिशय उत्तमरीत्या त्यांना अभिवादन केलं आहे. (bharat jadhav shared post on death anniversary of legendary nilu phule)

फोटो शेअर करून भरतने लिहिलंय की, “बाई वाड्यावर या…च्या पलीकडेही निळूभाऊ खुप खुप शिल्लक आहेत… ते जाणलं पाहिजे. आभाळाला हात लागलेले असतानाही आपल्या सामाजिक जाणिवांची मूळ जमिनीत घट्ट रोवलेला नटसम्राट..!” फोटोखाली चाहते देखील त्याच्या समर्थनार्थ कमेंट्स करत आहेत.

निळू फुलेंच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘एक होता विदुषक’, ‘गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘पिंजरा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘माझा पति करोडपती’, ‘गोष्ट छोटी डोंगराऐवढी’, ‘जैत रे जैत’, ‘कदाचित’, ‘भुजंग’, ‘माल मसाला’, ‘हळद रूसली कुंकु हसलं’, ‘बायको असावी अशी’, ‘पुत्रवती’, ‘लक्ष्मीची पाऊले’ इत्यादी मराठी चित्रपटांत काम केलं आहे. तर ‘औरत तेरी यही कहानी’, ‘सुत्रधार’, ‘हिरासत’, ‘सारांश’, ‘कुली’, ‘प्रेमप्रतिज्ञा’, ‘वो सात दिन’, ‘बिजली’, ‘दो लडके दोनो कडके’, ‘मशाल’, ‘तमाचा’, ‘जरासी जिंदगी’, ‘नरम गरम’, ‘सौ दिन सांस के’, ‘कब्जा’, ‘मां बेटी’, ‘पुर्णसत्य’, ‘सर्वसाक्षी’, ‘कांच की दिवार’, ‘दिशा’ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

अधिक वाचा-
“मराठी चित्रपटसृष्टीला काही वर्षे गरज…” मधुराणी गोखलेचे ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल
“उगा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?” हेमांगी कवीने तिच्या ‘त्या’ भूमिकेबद्दल लिहिली खास पोस्ट

हे देखील वाचा