अबब! इतक्या सुंदर महिला पुढारी! कुणी आहे अभिनेत्री तर कुणी आहे राजकीय घराण्याची सून!


रामराम मंडळी, आपल्या भारतात अनेक सौंदर्यवती स्त्रिया जन्म घेत असतात. त्या मॉडेलिंग करतात. अनेकदा मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स असे किताब देखील जिंकून येतात. यानंतर काही अभिनयाकडे वळतात तर काही व्यवसायाकडे! परंतु आपल्याकडे स्त्रिया फक्त इतकीच मजल मारत नाहीत तर त्या करियरची पुढची पायरी म्हणून राजकारणाची निवड करतात आणि जनतेची सेवा देखील करतात. आज आपण अशाच काही राजकीय महिला नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

नुसरत जहाँ
नुसरत जहाँ ह्या बंगाली चित्रपट सृष्टीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ८ जानेवारी १९९० साली जन्मलेल्या नुसरत या अवघ्या ३० वर्षांच्या आहेत. २०११मध्ये शोत्रू या सिनेमामधून त्यांनी बंगाली सिनेमामध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी खोका ४२०, योद्धा द वॉरियर, जमाई ४२०, हर हर ब्योमकेश, आमी जे के तोमार हे सिनेमे केले आहेत. यानंतर २०१९ मध्ये नुसरत यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षातर्फे बसिरहाट येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या निवडून देखील आल्या. आज त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. यानंतर त्यांनी याच वर्षी निखिल जैन या व्यावसायिकासोबत आपली लग्न गाठ बांधली आहे. नुसरत यांचं हेच लग्न फार चर्चेत देखील राहीलं होतं.

दिव्या स्पंदना
अभिनेत्री दिव्या हिला आपण सगळेच जण ओळखतो परंतु या नावाने नाही दुसऱ्याच नावाने! अभिनेत्री राम्या हे नाव आपल्या ओळखीचं वाटत असेल ना… चला तर मग सुरुवात करूयात राम्या यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. राम्या यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८२ साली बंगळुरू कर्नाटक इथं झाला. राम्या ची आई काँग्रेसची नेता होती तर वडील हे मोठे उद्योगपती होते. २००४ मध्ये तिने पहिल्यांदा ती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची नात असल्याचं जाहीर केलं. तिने तीच शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००३ मध्ये कानडी चित्रपट अभि मधून पदार्पण केलं. यानंतर तिने २००४ मध्ये तामिळ सिनेमा कुथ्थुमध्ये काम केलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळवलं. असं करत करत तिने कानडी, तामिळ, तेलुगू अशा तिन्ही भाषांच्या सिनेमांमध्ये यशस्वीरीत्या आतापर्यंत काम केलं आहे. ऑगस्ट २०१३ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राम्या ही काँग्रेस तर्फे खासदार म्हणून निवडून आली आणि २०१४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र तीचा पराभव झाला.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.

अलका लांबा
अलका या त्यांच्या चमकदार प्रतिमेव्यतिरिक्त त्यांच्या सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. अवघ्या १९ वर्षाच्या असताना त्या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये सहभागी झाल्या होत्या. तरुणांच्या सबलीकरणासाठी त्यांनी गो इंडिया फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. २० वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. आणि २०१५ मध्ये त्या दिल्ली विधानसभेवर आमदार म्हणून निवडूनही आल्या.

अंगुरलता डेका
अंगूरलता डेका मॉडल आणि अभिनेत्री सोबतच भारतीय जनता पक्षाच्या एक राजकीय नेता देखील आहेत. अंगुरलता यांनी मुख्यत्वे बंगाली आणि आसामी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्या स्वतः एक उत्तम दिग्दर्शिका आहेत. २०१६ मध्ये आसामच्या बतद्रोबा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

डिंपल यादव
डिंपल यादव या एक कोमल आणि ग्लॅमरस राजकारणी आहे,त ज्या नेहमीच साध्या राहणीमानामध्ये आपल्याला दिसतात. त्या कन्नौज येथून दोनदा समाजवादी पक्षाच्या खासदार राहिल्या आहेत. यांचा संबंध थेट राजकीय घराण्याशी येतो. त्यांचे पती अखिलेश यादव आणि सासरे मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच मुलायमसिंह हे लोकसभा खासदार देखील राहिले आहेत.

गुल पनाग
गुल पनाग ही एक अशी सौंदर्यवती राहिली आहे जिने मिस युनिव्हर्स मध्ये जागतिक मॉडेल्स सोबत स्पर्धा केली होती. याशिवाय ती भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी देखील आहे. २००३ मध्ये धूप या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने बर्‍याच हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिने चंदीगडमधून आम आदमी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मनोरमा सिक्स फिट अंडर, डोर, अब तक छप्पन २, बायपास रोड, धूप, हॅलो अशा अनेक सिनेमांमधून गुल पनाग रुपेरी पडद्यावर आतापर्यंत झळकली आहे.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.


Leave A Reply

Your email address will not be published.