Monday, July 1, 2024

…म्हणून मिथुन चक्रवर्तींच्या बाजुला बसत नाही कोणती अभिनेत्री, भारती सिंगने केला मोठा खुलासा

भारती सिंग (Bharti Singh) नेहमीच तिच्या विनोदी स्वभावाने प्रत्येकाला हसायला भाग पाडते. ती टेलिव्हिजन क्षेत्रातील पहिली गरोदर महिला सुत्रसंचालक आहे. जी तिच्या गरोदरपणातही सुत्रसंचालन करत आहे. ती पती हर्ष लिंबाचियासोबत शो होस्ट करताना दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrawarti), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), करण जोहर (Karan Johar) हा शो जज करत आहेत. अशातच या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ती मिथुन चक्रवर्तींबद्दल काही खुलासा करताना दिसत आहे.

शोमध्ये होली स्पेशल एपिसोड करण्यात येत आहे. या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात काही पाहुनेही सहभागी होताना दिसतात. यात भारती जया प्रदा यांच्याशी बोलताना म्हणते की, “मिथुन चक्रवर्तींच्या मागे तीन महिला बसत होत्या. त्यामधील एक महिला मिथुन यांना बघून शिट्टी मारत होती आणि आता ती तिच्या पतीसोबत हे प्रकरण सोडवत आहे. इकडे तिने शिट्टी वाजवली, तिकडे तिच्या लग्नाचा बॅन्ड वाजतोय.” ती म्हणते मिथुन यांच्यामुळे त्या दोघांच्या लग्नात अडचणी येत आहेत.

भारती परत जया यांच्याशी बोलताना म्हणते की, “तुम्ही यांच्या सोबत काम केले आहे, तर तुम्ही सांगा की कसे होते मिथुन.” तेव्हा जया म्हणतात की, “सेटवर पण त्यांच्या जवळ डान्सर्स असायच्या आणि मिथुनशी खूप बोलत असायच्या.” या नंतर भारती परत मिथुन यांना चिडवायला सुरूवात करते. परंतु तेव्हाच करण मिथुन यांना सपोर्ट करताना भारतीला म्हणतो की, “मी तुझ्यासोबत इतके काम केले आहे. तू स्वत: प्रत्येक अभिनेत्यासोबत रोमांस करते.” तिचा पतीही यावर म्हणतो की, “तू प्रत्ये अभिनेत्याची पप्पी घेते आणि मी कामवाल्या बाईचा हात पकडला तर चिडते.”

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

     दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा