‘हुनरबाज’च्या सेटवर ड्रिमगर्लची हजेरी, मिथुन चक्रवर्ती यांनी संधीचा फायदा घेत हेमा मालिनीसोबत केला भन्नाट डान्स

‘हुनरबाज’ हा एक लोकप्रिय रियॅलिटी शो आहे. बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी लवकरच कलर्स टीव्हीच्या हुनरबाज शोमध्ये पाहुणी म्हणून दिसणार आहे. आगामी भागाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर आगामी भागांमध्ये हेमा मालिनी परीक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत. या शोमध्ये लोकांना टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. या शोचे परिणीती चोप्रा, मिथुन चक्रवर्ती आणि करण जोहर परीक्षण करत आहेत.

‘हुनरबाज’च्या आगामी भागात दिसणार आहे हेमा मालिनी

‘हुनरबाज’च्या आगामी भागात हेमा मालिनी दिसणार असून, त्या परफॉर्म करताना दिसणार आहेत. हेमा मालिनी (Hema Malini) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचाही डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. या दोघांनी ८० च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यावेळच्या गाण्यांवर हेमा मालिनी नाचताना दिसल्या. यावेळी हेमा मालिनी यांनी गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. याशिवाय त्यांनी केस बांधले होते. याआधी माधुरी दीक्षित आणि फराह खान देखील हुनरबाजमध्ये दिसल्या आहेत. या शोमध्ये प्रत्येकजण स्पर्धकांसोबत खूप मजा करतो.

हेमा मालिनी आहेत मथुरेच्या भाजप खासदार

हेमा मालिनी या चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्या मथुरेतून भारतीय जनता पक्षाच्या खासदार देखील आहेत. दरम्यान, त्यांनी अनेकवेळा टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये देखील हजेरी लावली आहे.

हेमा मालिनी यांना दोन मुलीही आहेत

हेमा मालिनी यांचे धर्मेंद्र यांच्याशी लग्न झाले आहे, त्यांना या लग्नापासून दोन मुलीही आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. हेमा मालिनी यांचे चित्रपट चांगलेच पसंतीस उतरले आहेत. चित्रपटांमध्ये ऍक्शन करण्यासाठीही त्या ओळखल्या जात होत्या. हेमा मालिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडते. हेमा मालिनी अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधतात.

मिथुन आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. या दोघांची जोडी ८० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. यासोबतच आज दोघांचे नाव राजकारणाशीही जोडले जात आहे. आज दोघेही शोमध्ये एकत्र काम करताना दिसत आहेत, तर एक वेळ अशी होती जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता.

हेही वाचा – 

Latest Post