आजकालची तरुणपिढी त्याच्या आवडत्या कलाकारांच्या असणाऱ्या फॅशन फाॅलो करत असतात. ते किती गोरे आहे. ते कशामुळे इतके सुंदर दिसतात. या सर्व गोष्टीवर चाहत्याच खूप लक्ष असत. अनेकदा कलाकारांना त्यांच्या रंगावरुन ट्रोल केल जात. असाच एक किस्सा विनोदी कलाकार भाऊ कदम म्हणजेच भालचंद्र यांच्या मुलीसोबत झाला आहे. त्यांच्या मुलीच नाव मृण्मयी आहे. मृण्मयी सोशल मीडियावर सक्रिय असते.
मृण्मयीचा (Mrunmayi Kadam) युट्युबवर चॅनेल आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असते. तिने वयाच्या 18व्या वर्षी स्वत: चा व्यावसाय सुरू केला. ती व्हिडिओच्या माध्यमातून फॅशन टिप्स देत असते. नुकत्यात दिलेल्या मुलाखतीत मृण्मयीने तिच्या त्वचेच्या रंगाबाबत एक वक्तव्य केले आहे.
मृण्मयी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप या संबंधित व्हिडीओ तिच्या युट्युब चॅनेलवर शेअर करते. या सोबतच ती ट्रेन्डी हेअर बो नावाचा बिझनेस देखील करते. तिच्या या ब्रँडचं नाव ‘तारुंध्या’ असे आहे. मुलाखतीमध्ये मृण्मयीला एखादी मुलगी दिसायला कशी आहे? याबाबत अजूनही आपल्या समाजात बोललं जातं यावर प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देताना मृण्मयी म्हणाली की, “मी लहान असताना मला माझ्या कुटुंबात कधीच अशी वागणूक मिळाली नाही. आमच्या घरात माझे काका, आजी, पप्पा सगळेच सावळे आहेत. घरात फक्त माझी आई गोरी आहे. त्यामुळे मी जेव्हा युट्यूब चॅनल सुरु केलं तेव्हा यावरून मला काही ऐकावं लागेल असा विचार मी कधीच केला नव्हता.”
तसेच, माझ्या व्हिडिओवर खूप कमेंट येत असायच्या पण मी त्या गोष्टाचा फार विचार करत नसे. एके दिवशी “तुझ्या स्किन टोनबाबत तुला खूप आत्मविश्वास आहे” अशी कमेंट आली होती. त्यावेळी मी असा विचार केला की, लोक गोऱ्या मुलींनाही असं कधी विचारता का? त्यानंतर मी माझ काम सुरू ठेवले, असे मृण्मयीने सांगितले. (Bhau Kadam’s daughter Mrinmayi replied to the people who commented on the color)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एका हातात युग, तर दुसऱ्या हातात न्यासा; घामात लदबद झालेल्या काजाेलचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल
फोटोतील ‘या’ मुलीला ओळखल का? आज करतीये मराठी सिनेसृष्टीवर राज्य