बाॅलिवूडचे प्रसिद्ध जाेडपे काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण अनेकदा तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. सध्या न्यासा सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, ती तिच्या फॅशन सेन्सने इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात आता न्यासाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिची आई काजोलसोबत एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे.
व्हायरल क्लिपमध्ये न्यासा (nysa devgan) खूपच क्यूट दिसत आहे. अशात पॅपराझींने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की,”काजोल तिच्या मुलांसोबत किती क्यूट दिसत आहे, न्यासा देवगण किती गाेंडस आहे.”
युजर्सने केल्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट
अशात या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एकाने लिहिले की, “न्यासा ओरीचा शोध घेत आहे.”, तर दुसरा म्हणाला, ‘मोठ्या स्टार्सची मुलं फक्त गोंडस दिसतात… जर आपल्यापैकी कोणीही या व्हिडिओमध्ये असता, तर कोणीही क्यूट बोलले नसते.’
View this post on Instagram
न्यासा देवगणने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये केले, तर हायस्कूल शिक्षण घेण्यासाठी ती युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूर येथे गेली. अशात न्यासा सध्या स्वित्झर्लंडच्या ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे.
View this post on Instagram
काजाेल आणि अजय देवगण 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न बंधनात अडकले. काजाेलल न्यासा व्यतिरिक्त युग नावाचा एक मुलगाही आहे, ज्याचा जन्म 13 सप्टेंबर 2010 रोजी झाला.( nysa devgan childhood video with mother and actress kajol went viral people says she is searching for orry)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाने क्रिती सेननला मंदिरात निरोप देताना केले ‘हे’ कृत्य, भाजप नेते भडकले