Sunday, April 14, 2024

नॉर्मल वाटलो का! भोजपुरी सुपरस्टारच्या ताफ्यात आलिशान कारची एन्ट्री, टॉप स्पीड 240 किमी; किंमत…

सिनेसृष्टीतील कलाकार कोणता ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. कधी तो त्याच्या नवीन घरामुळे, नवीन सिनेमामुळे, तर कधी नवीन गाडीमुळे चर्चेत असतो. कलाकार त्याच्या आलिशान जीनवशैलीमुळेही सर्वांचे लक्ष वेधत असतो. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव हा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या कोणत्याही सिनेमा, गाणे किंवा वक्तव्यामुळे नाही, तर आपल्या नव्या आलिशान कारमुळे चर्चेत आहे.

खरं तर, खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) त्याच्या ताफ्यात आता नवीन एसयूव्ही लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) कार आली आहे. या कारची किंमत लाख नाही, तर कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. या नवीन कारविषयीची माहिती अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे. चला तर, त्याच्या नवीन कारविषयी जाणून घेऊयात…

खेसारी लाल यादवची नवीन कार
अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसत आहे. व्हिडिओत नवीन गाडीची पूजा केली जात असल्याचे दिसत आहे. पत्नी आणि मुलांव्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यही पूजा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्यासाठी तुम्हा सर्वांच्या प्रेमापेक्षा जास्त काहीच नाहीये. आज या प्रेमामुळे कारही आली आहे. सर्वांना धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Khesari Lal Yadav (@khesari_yadav)

कारची वैशिष्ट्ये
खेसारी लाल यादव याची लँड रोव्हर डिफेंडर (Khesari Lal Yadav Land Rover Defender) कार खूपच लक्झरी आहे. खेसारीने कारचा टॉप मॉडेल खरेदी केला आहे. याची किंमत जवळपास 2.30 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या कारची टॉप स्पीड ताशी 240 किमी इतका आहे. अवघ्या 5 ते 7 सेकंदात ही कार वेग पकडू शकते.

खेसारीविषयी थोडक्यात
खेसारी लाल यादव याचे खरे नाव शत्रुघ्न कुमार यादव आहे. भोजपुरी सिनेसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्याव्यतिरिक्त तो गायक, डान्सर आणि मॉडेलही आहे. त्याने आतापर्यंत 70हून अधिक सिनेमात काम केले आहे. खेसारी बॉलिवूड सिनेमातही झळकला आहे. विशेष म्हणजे, तो ‘बिग बॉस 13’ शोचाही भाग राहिला आहे. (bhojpuri actor khesari lal yadav bought luxury suv car price more than 2 crore and speed 240 km per hour)

महत्त्वाच्या बातम्या-
‘राखी सावंत कधीच बनू शकत नाही आई’, आदिलच्या दाव्याची अभिनेत्रीने पुराव्यासकट खोलली पोल; वाचा
‘रॉकी और रानी…’ सिनेमाच्या यशाबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रिलीजपूर्वी येत होते…’

हे देखील वाचा