Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘रॉकी और रानी…’ सिनेमाच्या यशाबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रिलीजपूर्वी येत होते…’

‘रॉकी और रानी…’ सिनेमाच्या यशाबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रिलीजपूर्वी येत होते…’

मागील महिन्यात 28 जुलै रोजी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला होता. सध्या ‘गदर 2’ची क्रेझ सुरू असूनही 3 आठवड्यांनंतरही हा सिनेमा चित्रपटगृहात टिकून आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन करण जोहर याने केले असून सिनेमातील आलिया-रणवीरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशात सिनेमाच्या यशाबद्दल करण जोहरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर, जाणून घेऊयात…

अलीकडेच माध्यमांशी बोलताना करण जोहर (Karan Johar) याने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahani) सिनेमाविषयी भाष्य केले. त्याने म्हटले की, “सत्य हे आहे की, सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. मी याची अपेक्षा करत नव्हतो, असे मुळीच नाहीये. मात्र, त्यावेळी आपल्या इंडस्ट्रीतील वातावरण थोडे अशांत होते. मी 7 वर्षांमध्ये माझ्या दिग्दर्शनातील कोणताच सिनेमा रिलीज केला नाहीये. मागील 3 वर्षे माझ्यासाठी किंवा इंडस्ट्रीसाठी सोपे नव्हते. खूप नकारात्मकता होती आणि त्या सर्व चिंतांमुळे मला अनेक प्रश्न पडले होते.”

पुढे बोलताना त्याने हे मान्य केले की, मागील काही काळापासून त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या रिलीजपूर्वी करण जोहरला पॅनिक अटॅक येत होते. मात्र, असे असूनही तो म्हणतो की, अपयश हे प्रत्येकाच्या कारकीर्दीतील प्रवासात महत्त्वाचे असतात. मात्र, यावेळी त्याने यावेळी अपयशी ठरणे स्वीकारले नसते. अखेर हा सिनेमा त्या स्थितीत पोहोचला आहे, जिथे चित्रपट निर्मात्यासाठी काहीतरी बनण्याची किंवा बिघडण्याची स्थिती असते.

करण जोहर याने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर त्याने 35 वर्षांनंतर हा सिनेमा बनवला असता, तर धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या भूमिकेत काजोल आणि शाहरुख खान यांना घेतले असते. सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्याव्यतिरिक्त धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त आहे. सिनेमाने आतापर्यंत 145.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (director karan johar opens up on success of rocky aur rani kii prem kahaani know here)

महत्त्वाच्या बातम्या-
काळीज तोडणारी बातमी! 40 वर्षीय गायकाच्या 3 मुली झाल्या पोरक्या, संगीतविश्वावर शोककळा
सनीच्या ‘Gadar 2’चा बॉक्स ऑफिसवर ‘हातोडा’, 400 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्यासाठी हवेत ‘फक्त’ एवढे रुपये

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा