Tuesday, February 18, 2025
Home भोजपूरी ऐकलंत का मंडळी! भोजपुरी अभिनेत्रीच्या स्वप्नात येतो ‘हा’ व्यक्ती, गाण्यातून केला खुलासा

ऐकलंत का मंडळी! भोजपुरी अभिनेत्रीच्या स्वप्नात येतो ‘हा’ व्यक्ती, गाण्यातून केला खुलासा

अभिनयासोबतच आपल्या लूक्समुळेही चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे ‘अक्षरा सिंग’ होय. अक्षराच्या चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळते. ज्या व्हिडिओ आणि चित्रपटात ती दिसते ते सुपरहिट होतात. नुकतेच तिचे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. हे गाणे जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या एकाच दिवसात या गाण्याने लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अक्षराच्या स्वप्नात नेमकं कोण येतं, याचा या गाण्यामधून खुलासा केला आहे.

हे वाचून तुम्हीही विचारात पडला असाल. खरं तर अक्षराचे नुकतेच रिलीझ झालेल्या गाण्याचे नाव ‘फलनवा के बेटा’ असे आहे. या गाण्यात अक्षरा आपल्या मैत्रिणीला सांगत आहे की, ‘फलनवा के बेटा सपनवा में आता है.’ अक्षरा गाण्यामध्ये म्हणते की, तिची झोप, सुख, चैन सर्व फलनवाच्या मुलाने हिसकावून घेतले आहे. ती त्याच्या प्रेमात पडली आहे.

अक्षराचे हे गाणे वेद एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ झाले आहे. हे गाणे अक्षराने गायले आहे. या गाण्याला प्रियांशू सिंगने म्युझिक दिले आहे, तर या गाण्याचे लिरिक्स विक्की विशाल आणि शिव कुमार यांनी दिले आहे. या गाण्यात अक्षरासोबत विशाल राजपूतही दिसत आहे. अक्षराने या गाण्याबद्दल म्हटले आहे की, “हे गाणे आनंदी करणारे आहे. विशेष म्हणजे हे त्या जोडप्यांसाठी आहे, जे आपले प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, परंतु इशाऱ्यातून सर्वकाही बोलून जातात.”

केवळ एकाच दिवसात या गाण्याला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अक्षराने गाण्याबाबत बोलताना म्हटले की, “मी आपल्या चाहत्यांना आवाहन करते की, जर तुम्हाला हे गाणे आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हे शेअर करा. त्यांनाही हे गाणे आवडेल.”

यापूर्वीही अक्षराचे अनेक गाणी व्हायरल झाली होती. अक्षराने आतापर्यंत ‘त्रिदेव’, ‘हीरो नंबर १’, ‘मां तुझे सलाम’, ‘लैला मजनू’ यांसारख्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग

-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा

हे देखील वाचा