सौंदर्यांची खाण! ‘या’ पाच भोजपुरी अभिनेत्रींपुढे फिक्या पडतात बॉलीवूड सिनेतारका


बॉलिवूडप्रमाणे भोजपुरी सिनेमाचीही एक वेगळी क्रेझ आहे. त्याचबरोबर भोजपुरी चित्रपटांमधील नायिका आपल्या धाडसी अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात मागे पडत नाहीत. भोजपुरी सिनेमांच्या बर्‍याच अभिनेत्रींच्या फॉलोव्हिंगमुळे बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतो. यामध्ये मोनालिसा, राणी चटर्जी, आम्रपाली दुबे, काजल राघवाणी आणि अक्षरा सिंह यांची नावे आहेत.

मोनालीसा

पश्चिम बंगालच्या मोनालिसाने आपल्या करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांद्वारे केली. तिचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. चित्रपटसृष्टीत तिला मोनालिसा म्हणून ओळखलं जातं. मोनालिसाने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भोजपुरी सिनेमातही तिला खूप पसंत केलं जातं. ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मोनालिसाने भोजपुरी सिनेमाच्या जवळपास सर्व मोठ्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. तसेच तिने अभिनेता व गायक विक्रांतसिंग राजपूतशी लग्न केलं आहे.

आम्रपाली दुबे

आम्रपाली दुबे ही भोजपुरी चित्रपटाची सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनय आणि हॉटनेसचे चाहते दिवाने आहेत. आम्रपाली जितकी बोल्ड आहे तितकीच सुंदरही आहे. आम्रपालीने चित्रपटात येण्यापूर्वी टीव्ही मालिकांमध्येदेखील काम केलं होतं. त्यानंतर आम्रपालीचा लूक खूप बदलला. आम्रपालीची फॅन फॉलोइंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. आज आम्रपाली दुबे हे भोजपुरी सिनेमाचं एक सुप्रसिद्ध नाव झालं आहे. आम्रपालीने ‘मेरा नाम करेगी रोशन’ या मालिकेतही काम केलं आहे. २०१४ मध्ये तिने भोजपुरी सिनेमात पदार्पण केलं.

राणी चॅटर्जी

राणी चटर्जी हिचा जन्म मुंबईत झाला असला तरी, बॉलिवूडऐवजी तिने भोजपुरी चित्रपटांत पदार्पण केलं आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली. राणी चटर्जी हिला भोजपुरी सिनेमाची राणी म्हणूनही ओळखलं जातं. त्याचबरोबर भोजपुरी सिनेमात २५० हून अधिक चित्रपट केलेल्या राणी चटर्जीने मस्तराम वेबसिरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा पदार्पण केलं आहे.

अक्षरा सिंह

अक्षरा सिंह एक उत्तम अभिनेत्री आहे आणि सोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. २०२० मध्ये तिने ‘मैंने ना बुलाया’ आणि ‘बाबू कॉल करें क्या’ या गाण्यांनी आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. भोजपुरी चित्रपटांशिवाय अक्षराने टीव्हीवरील ‘काला टीका’ आणि ‘सर्विस वाली बहु’ या मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

काजल राघवाणी

काजल राघवणीने २०११ मध्ये ‘सुगना’ चित्रपटाद्वारे भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. काजलने वयाच्या १६ व्या वर्षी गुजराती चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. काजलने गुजरातीमध्ये २५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं, त्यानंतर तिने २०१३ मध्ये भोजपुरी सिनेमातून पदार्पण देखील केलं होतं. सध्या ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते.


Leave A Reply

Your email address will not be published.