Saturday, May 30, 2026
Home बॉलीवूड हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात प्रदर्शित झाला अन् 2026 मधील ठरला सुपरहिट हॉररपट

हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात प्रदर्शित झाला अन् 2026 मधील ठरला सुपरहिट हॉररपट

‘धुरंधर 2’ हा चित्रपट काही दिवसापासुन कमाईच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत धुमाकुळ घालत आहे. तर अश्यातच ‘ऑब्सेशन’  नावाचा एक भयपट जागतिक बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. त्याने काही दिवसातच 7 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने, प्रदर्शित झाल्यानंतर अगदि 10 दिवसांतच सुमारे 80 दशलक्ष डॉलर्स  कमावले आहेत, ज्यामुळे चित्रपटसृष्टीतील जाणकारही आश्चर्यचकित झाले आहेत. आणि या चित्रपटाची त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मायकल जॉनस्टन आणि इंडे नवारेट यांची प्रमुख भूमिका असलेला हा ‘हॉरर थ्रिलर’ चित्रपट 15 मे 2026 रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला होता आणि 29 मे रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला. मात्र, या चित्रपटाच्या भारतीय प्रदर्शनावरून एक वाद निर्माण झाला आहे; कारण सेन्सॉर प्रमाणन मंडळाने चित्रपटातील 38 सेकंदांचे दोन महत्त्वाचे प्रसंग वगळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वगळण्यात आलेल्या एका दृश्यात अत्यंत हिंसक मारामारी होती, तर दुसऱ्या 14 सेकंदांच्या दृश्यात लैंगिक क्रिया दर्शवल्या होत्या. या कात्रीमुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत; तसेच अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी भारतात प्रदर्शित होणारी ही ‘सेन्सॉर केलेली आवृत्ती’ पाहून आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.हा वाद निर्माण होऊनही, ‘ऑब्सेशन’ने भारतीय चित्रपटगृहांमध्ये दमदार सुरुवात केली आहे. ज्या प्रेक्षकांना भयपट आवडतात. त्याच्यासाठी हा उत्तम चित्रपट आहे.

या चित्रपटात कूपर (Kpoor)टॉमलिन्सन आणि मेगन लॉलेस यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संपादन करी बार्कर यांनी केले आहे. तर  रॉक बर्वेल यांनी याला संगीत दिले आहे. IMDb वर 8.2 /10 चे दमदार रेटिंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

टॉक्सिक’च्या सेटवर कियारा अडवाणीला ‘Hi-Hello’ म्हणण्यास होती मनाई, कारण काय घ्या जाणुन

हे देखील वाचा