आलं रे आलं, अंतरा सिंह प्रियंकाचे नवे होळी गीत सोशलवर सुपरहीट!! समर सिंहसोबतच्या रोमँटिक व्हिडिओचा सोशलवर राडा

आलं रे आलं, अंतरा सिंह प्रियंकाचे नवे होळी गीत सोशलवर सुपरहीट!! समर सिंहसोबतच्या रोमँटिक व्हिडिओचा सोशलवर राडा


होळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील तारेही या उत्सवाची गाणी घेऊन येत आहेत. मार्चच्या अखेरीस रंगांचा उत्सव असतो, पण होळीची गाणी मात्र फेब्रुवारीपासूनच यायला सुरू झाली आहे.

खेसारी लाल यादव, पवन सिंग, शिल्पी राज यांची गाणी दिवसेंदिवस लाँच होत असून, त्यांना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. नुकतेच, भोजपुरी गायिका अंतरासिंग प्रियंका आणि समर सिंग यांचा नवीन संगीत अल्बम रिलीज झाला आहे. ‘हमरा जस जवान’ असे या होळीगीताचे बोल आहेत.

या भोजपुरी होळीगीतात अंतरा सिंह प्रियांका डेनिम हॉट पँट आणि शॉर्ट जॅकेटमध्ये अप्रतिम बोल्ड लूक देत आहे. व्हिडिओच्या सुरूवातीस अंतरा चार मुलांच्या एका गटामध्ये फसली आहे, जे तिला होळी खेळण्यापासून रोखतात. त्यानंतर समर सिंगची एन्ट्री होते.

होळीच्या रंगाबरोबरच समर सिंग आणि अंतरा यांच्यातील रोमान्सही म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा भोजपुरी रोमँटिक व्हिडिओ वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूबवर, 28 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीज केला गेला. एका आठवड्यातच या व्हिडिओला लाखो व्ह्यूवज मिळाले.

या गाण्याला अंतरा सिंग प्रियंका आणि समर सिंग यांनी आवाज दिला असून, याच जोडीने तीने गाण्यात अभिनयही केला आहे. या गाण्याचे बोल कुंदन प्रीत यांनी लिहिले आहेत आणि संगीत रोशन सिंग यांनी दिले आहे.

तरा आणि समर यांच्या धमाकेदार नृत्यप्रदर्शनाचे श्रेय भोजपुरी नृत्य दिग्दर्शक संदीप राज यांना जाते. तर संतोष यादव आणि नवीन वर्मा यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

अंतराचे ‘पटना के घाघरा 52 घास के’ हे गाणेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. आतापर्यंत 38 लाखाहून अधिक लोकांनी हे गाणे युट्यूबवर पाहिले आहे. याशिवाय तिचे खेसारी लाल यादवसोबतचे ‘भतिजवा के मौसी कहां बिया’ गाणे देखील खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला 10 दशलक्षाहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. अंतरा अभिनयाशिवाय म्युझिक अल्बममध्ये आवाज देऊन आपले कौशल्य दाखवत असते.


Leave A Reply

Your email address will not be published.