सध्या ‘पावरी हो रही है’ व्हिडिओंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अगदी सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी यावर व्हिडिओ बनवले आहेत. ते जबरदस्त व्हायरलही झाले आहेत. परंतु अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अभिनेत्री ‘पावरी नहीं हो रही है’ असे म्हणताना दिसत आहे. व्हिडिओतील तिचा झक्कास अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
खरं तर भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती शूटिंगदरम्यान मिळालेल्या फावल्या वेळेत इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. हे लाईव्ह तिने कारमध्ये बसून केले होते. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना तिने म्हटले की, “ही मी आहे, ही माझी टीम आहे आणि आमची इथे कोणतीही पावरी होत नाहीये. आमचे काम सुरू आहे.”
तिच्या या व्हिडिओवर अनेक चाहते जबरदस्त कमेंट करताना दिसत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच आम्रपालीने बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या हिट गाण्यावर आपल्या मजेशीर एक्सप्रेशन्ससोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ छोटाच आहे, पण आम्रपालीच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडिओही भलताच आवडला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत ती जांभळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “या गाण्याने माझे बालपण आनंदी केले होते. मी या गाण्यावर खूप एन्जॉय करायचे.”
याव्यतिरिक्त आम्रपाली दुबेची जोडी गायक आणि अभिनेता दिनेश लाल यादवसोबत नेहमीच पसंत केली जाते. त्यांनी अनेक भोजपुरी अल्बममध्ये आपला आवाजही दिला आहे.
तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘लव्ह विवाह डॉट कॉम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अंजय रघुराज हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सोबतच प्रदीप पांडे चिंटू आणि काजल राघवानी यांचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त आम्रपालीला ‘रोमियो राजा’, ‘निरहुआ द लीडर’, यांसारख्या चित्रपटांमध्येही पाहिले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ