Wednesday, November 13, 2024
Home भोजपूरी ‘कमरिया हिला रही है’ गाण्यावर अमेरिकन अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, भोजपुरी स्टारनेही लावले ठुमके, पाहा व्हिडिओ

‘कमरिया हिला रही है’ गाण्यावर अमेरिकन अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, भोजपुरी स्टारनेही लावले ठुमके, पाहा व्हिडिओ

भारतातील आवडत्या सणांपैकी एक सण म्हणजेच ‘होळी.’ सध्या होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक भोजपुरी गाणी आपल्याला पाहायला तसेच ऐकायला मिळत आहेत. भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंगने होळीवरील गाण्यांनी आपल्या चाहत्यांना चांगलेच खुश केले आहे. नुकतेच त्याचे होळीवरील एक गाणे जबरदस्त व्हायरल होत आहे. हे हिंदी गाणे मागील वर्षी रिलीझ झाले होते. यामध्ये विशेष म्हणजे अमेरिकन डान्सर आणि अभिनेत्रीही डान्स करताना आपल्याला दिसत आहे.

अमेरिकन डान्सर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलिब ही भोजपुरी अभिनेता पवन सिंगच्या ‘कमरिया हिला रही है’ म्युझिक अल्बममध्ये देसी अंदाजात थिरकताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पवनचा थाट पाहायला मिळतोय. यानंतर दोन व्यक्ती त्याच्या खांद्याची मसाज करताना दिसतात. हेच दोघे पवनला म्हणतात की, ‘भाई होळीचा सण आहे, रेडियोवर आपल्या नवीन गाण्याची फर्माईश करा.’ त्यावेळी अभिनेता म्हणतो की, ‘नवीन गाण्यासाठी नवीन अभिनेत्रीही पाहिजे.’ यानंतर एक व्यक्ती त्याला भांग पिण्यास सांगतो. त्यानंतर लॉरेनची धमाकेदार एंट्री होते. तो तिच्याकडे एकटक बघतच राहतो. यानंतर गायिका पायल सिंग गाण्याचा आवाज वाढवते.

‘कमरिया हिला रही है’ गाण्याच्या व्हिडिओमध्ये पवन आणि लॉरेन एकमेकांसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. पवन आणि लॉरेनच्या ठुमक्यांची प्रशंसा केली जात आहे. दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

हे गाणे पवन आणि पायलने एकसोबत गायले आहे. या गाण्याला पायलने म्युझिक दिले आहे, तर लिरिक्स मोहसिन शेख यांचे आहेत.

हे गाणे २४ फेब्रुवारी, २०२० रोजी ‘जस्ट म्युझिक’ने आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले होते. या गाण्या एका वर्षानंतरही चाहत्यांकडून प्रेम मिळत आहे. या गाण्याला आतापर्यंत ७ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

नुकतेच एका भोजपुरी युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले होते की, यावेळी होळी संपताच या गाण्याला २०० मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले पाहिजे.

विशेष म्हणजे लॉरेनने यापूर्वीही अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर ती बादशाहच्या ‘मर्सी’ या म्युझिक अल्बममध्येही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगभरातील स्टंटमॅनच्या माऊलींसाठी ‘विद्युत जामवाल’ने प्रसिद्ध केला खास व्हिडिओ; कॅप्शनमुळे अल्पावधीतच तुफान व्हायरल

-थ्रोबॅक व्हिडिओ: आठ वर्षांपुर्वी प्रभुदेवाबरोबर श्रीदेवीने ‘या’ गाण्यावर धरला होता ठेका, पाहा धमाकेदार डान्स

-अभिनेत्रीचं देखणं रूप! हिमांशीने घेतला ‘उमराव जान’मधील ऐश्वर्याचा अवतार, ‘या’ गाण्यावर केले लिप सिंक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा