Tuesday, February 18, 2025
Home भोजपूरी लाल साडीत पत्नी निघाली माहेरी! अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ने तोडले सर्व रेकॉर्ड!

लाल साडीत पत्नी निघाली माहेरी! अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ने तोडले सर्व रेकॉर्ड!

भोजपुरी स्टार अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ गाण्याचा ऑडिओ रसिकांकडून खूप पसंत केला गेला. आता या गाण्याच्या व्हिडिओला देखील चांगलीच पसंती मिळत आहे. गाण्याचे चित्रीकरण खूप चांगल्या ठिकाणी केले गेले आहे. व्हिडिओमध्ये असे दाखविले गेले आहे की, एक पत्नी लाल रंगाची साडी घालून, आपल्या माहेरी जात आहे. तर हे पाहून तिचा पती तिला मजेत काहीतरी बोलू लागतो. हे व्हिडिओ गाणे ऐकायला आणि बघायला खूप मजेदार आहे.

वर्ल्डवाइड रेकॉर्डद्वारे प्रस्तुत, हे गाणे अंकुश राजाने अतिशय मजेच्या मूडमध्ये गायले आहे. हे गीत गर्दा सियाडीह यांनी लिहिले आहे, तर याचे सुमधुर संगीत आर्या शर्मा यांनी दिले आहे. त्याचे निर्माते लखन बाबा आहेत, तर दिग्दर्शक गोल्डी जयस्वाल आहेत.

अंकुश राजाचे ‘नारियलवा जोड़े जोड़े’ हे गाणे खूप लोकप्रिय होत आहे. अंकुश राजाच्या आवाजात हे गाणे अप्रतिम वाटत आहे. गाण्याला भरभरुन मिळालेल्या प्रतिसादावर बोलताना, अंकुश राजा म्हणाला की, “नारियलवा जोड़े जोड़े हे माझे खास गाणे आहे. मला खूप आनंद होत आहे की, प्रेक्षक याला इतके प्रेम देत आहेत. सर्व चाहते आणि प्रेक्षकांचे आभार.”

तसेच, प्रेक्षकांमध्ये भोजपुरी गाण्यांची जबरदस्त क्रेझ आहे. ही गाणी यूट्यूबवर रिलीझ होताच, जोरदार व्हायरल होऊ लागतात. दरवेळी भोजपुरी प्रेक्षकांकडून या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळते. भोजपुरी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक, आपल्या सुरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

हे देखील वाचा