व्हिडिओ: ‘दिल डुबा’ गाण्यावर प्राचीचा हटके अंदाज, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Bhojpuri Actress Prachi Singh dance on Dil duba song, video viral on Instagram


भोजपुरी अभिनेत्री प्राची सिंग ही सोशल मीडियावर अनेक पोस्ट करून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या चाहत्यांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. नुकताच प्राचीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

तिने बॉलिवूडमधील ‘दिल डुबा’ या गाण्यावर अभिनय करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

प्राचीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले हे गाणे ‘खाकी’ या चित्रपटातील आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर चित्रीत झाले होते. प्राचीने या ‘दिल डुबा’ गाण्यावर डान्स करून सगळ्यांना घायाळ केले आहे. या गाण्यातील तिची अदा आणि हावभाव सगळ्यांना आकर्षित करत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. सगळ्या साज शृंगारात ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करून तिने या गाण्याची लाईन कॅप्शनमध्ये लिहिली आहे. तिने असे लिहिले आहे की, ‘मैं तेरे झासे मे ना आऊंगी.’ हे गाणे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती किशन राय यांच्यासोबत ‘मेरे प्यार से मिला दे’ या चित्रपटात झळकणार आहे. चंदन सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनुप अरोरा, लोटा तिवारी, संचिता बॅनर्जी, आशा तिवारी हेदेखील दिसणार आहेत. या व्यतिरिक्त तिने ‘पाच महरी’ या चित्रपटात काम केले आहे. यामध्ये प्रियंका पंडित, निशा दुबे, कनक पांडे, संचित बॅनर्जी, किशन राय यांनी काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.