दिवसेंदिवस एकापेक्षा एक जबरदस्त भोजपुरी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे भोजपुरी गाण्यांची लोकप्रियता खूप वाढलेली दिसत आहे. येणाऱ्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकही उत्तम प्रतिसाद देत असतात.
भोजपुरी सुपरस्टार राकेश मिश्रा यांचे ‘ए राजा जाई ना बहरिया’ हे गाणे या दिवसांत खूप व्हायरल होत आहे. या गाण्याद्वारे मिश्रा यांना भोजपुरी प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. हे गाणे शुभकांत कुमार आणि सोनू सरग यांनी लिहिले आहे, तर अभिनेत्री त्रिशा कर मधु गाण्यात अभिनय करताना दिसली आहे. गाण्यात त्रिशा कर मधुने केलेल्या अभिनयाने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
मिश्राच्या या म्युझिक अल्बममध्ये बोल्ड सीन चित्रित करण्यात आले आहेत. ज्यात त्रिशा कर मधू आपल्या हॉट लूकने प्रेक्षकांना घायाळ करत आहे. ‘ए राजा जाई ना बहरिया’ हे गाणे म्युझिक वाइडद्वारे 28 जुलै 2020 रोजी रिलीज करण्यात आले होते. गाण्याला आतापर्यंत 23 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. त्याचवेळी या गाण्याच्या व्हिडिओखाली 55 हजाराहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. राकेश मिश्रा यांचे हे गाणे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील नेटकऱ्यांमुळे अधिक लोकप्रिय झाले आहे. तसेच, बरेच नेटकरी व्हिडिओचे खूप कौतुक करीत आहेत.
या गाण्यानंतर राकेश मिश्राची फॅन फॉलोइंग बरीच वाढली आहे. त्यांच्या चाहत्यांची यादी पवन कुमार आणि खेसारीलाल यादवपेक्षा काही कमी नाही, हे गाण्याची लोकप्रियता पाहून सहज लक्षात येते. राकेशचा हा व्हिडिओ पाहून प्रज्ञान नावाच्या वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, “राकेश भाई तू तर खेसारी आणि पवन दोघांना मागे टाकले आहे”. आणखी एक वापरकर्ता कैफी अलीने लिहिले की, “आजकाल असे लग्न झाले नसेल ज्यात डीजेवर हे गाणे वाजवले नाही.”
गाण्यांशिवाय राकेश मिश्रा यांचे चित्रपट भोजपुरी बॉक्स ऑफिसवरही जोरदार धमाके करत असतात. त्यांच्या चित्रपटांचे रोमँटिक व्हिडिओही यूट्यूबवर बरेच ट्रेंड करत असतात.