‘कांटा लगा… बंगले के पीछे’, गाण्यावर थिरकली अभिनेत्री, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Bhojpuri Movie Banarsi Babu Sonalika Prasad Shared An Interesting Dance Video That Is Sure To Grab Your Attention


सेलिब्रिटी आपल्या नवीन सिनेमांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आता यामध्ये भोजपुरी अभिनेत्री सोनालिका प्रसाद हिचाही समावेश झाला आहे. ती सध्या आपल्या आगामी ‘बनारसी बाबू’ या चित्रपटामुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. ती लखनऊमध्ये भोजपुरी चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि सेटवरून फ्री झाल्यानंतर मधल्या वेळेत आपले मजेशीर व्हिडिओज शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत आहे. सोनालिकाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

सोनालिकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘कांटा लगा… बंगले के पीछे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल डिझाईनच्या ड्रेसमध्ये डान्स करत आहे. तिचे मुव्हज चाहत्यांना भावले आहेत. हे गाणे सोनालिकाने आपल्या हॉटेलच्या खोलीमध्ये शूट केले आहे, जे बॅकग्राऊंडला स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

‘कांटा लगा’ हे गाणे सन १९७२ साली बॉलिवूडच्या ‘समाधि’ या चित्रपटातील आहे. हे गाणे गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायले आहे, तर आशा पारेख यांच्यावर हे गाणे चित्रित केले होते.

‘कांटा लगा’ या गाण्याचे रिमिक्स गाणे शेफाली जरीवालावर चित्रित केले गेले होते. रिमिक्समार्फत जरीवालाला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आजही चाहते तिला ‘कांटा लगा गर्ल’ या नावाने ओळखतात. आता याच गाण्यावर सोनालिका चर्चेचा विषय ठरत आहे.

तिने नुकतेच आपल्या आगामी ‘बनारसी बाबू’ चित्रपटाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये ती निर्माते आणि सहकलाकारासोबत दिसत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सोनालिका वेब सीरिज ‘लव्ह गुरू’मध्येही दिसणार आहे. ही पहिली वेब सीरिज असेल, ज्यामध्ये सोनालिका बोल्ड अंदाजात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भोजपुरी गायक नीलकमल सिंगचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ; इंटरनेटवर करतंय धमाल, पाहा व्हिडिओ

-रेकॉर्ड ब्रेक युट्यूबर अंकित यादवचा नवा विक्रम, ‘त्या’ गाण्याला मिळाल्या तब्बल ६४ कोटी हिट्स

-‘कुंवारी आपने छोड़ा नहीं और श्रीमती किसी ने बनाया नहीं’, म्हणत गंगुबाई काठियावाडीचा पहिला टिझर रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.