Friday, November 22, 2024
Home भोजपूरी ‘निरहुआ’ आणि अभिनेत्री अक्षरा सिंगच्या रोमँटिक व्हिडिओवर चाहते झाले फिदा! पाहायला मिळाली त्यांची अप्रतिम केमिस्ट्री

‘निरहुआ’ आणि अभिनेत्री अक्षरा सिंगच्या रोमँटिक व्हिडिओवर चाहते झाले फिदा! पाहायला मिळाली त्यांची अप्रतिम केमिस्ट्री

भोजपुरी सुपरस्टार दिनेश लाल यादव म्हणजेच ‘निरहुआ’ आणि सुंदर अभिनेत्री अक्षरा सिंग यांचा एक रोमँटिक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निरहुआ आणि अक्षरा सिंग एका गाण्यावर एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. अशातच त्यांचा हा व्हिडिओ समोर येताच व्हायरल होऊ लागला आहे. या गाण्यात त्यांची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे. यामुळेच निरहुआ आणि अक्षराच्या चाहत्यांनी या व्हिडिओला खूप पसंत दर्शवली आहे.

खरं तर, हा व्हिडिओ अक्षरा आणि निरहुआचा आगामी चित्रपट ‘सबका बाप अंगुठा छाप’च्या सेटवरील आहे, ज्याची शूटिंग उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये चालू आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा मोशन पिक्चर्स करत आहे, ज्याचे निर्माते प्रदीप के शर्मा आहेत. अनिता शर्मा आणि पदम सिंग हे चित्रपटाचे सहकारी निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन पराग पाटील करत आहेत.

चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर निरहुआ आणि अक्षरा म्हणाले की, त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून पसंती दिली जात आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. चित्रपट यशस्वी होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. अक्षरा सिंग म्हणाली, “हा चित्रपट खूप स्वच्छ आणि प्रदीप शर्माच्या स्टाईलमधील चित्रपट आहे, तर अर्थातच प्रेक्षक याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पाहू शकतील. मी एका ओळीत म्हणाले, तर चित्रपट उत्कृष्ट असेल. कोणीही चित्रपट चुकवू नका अशी मी विनंती करते.”

विशेष म्हणजे या चित्रपटाचा अभिनेता निरहुआ कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. निरहुआला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आगीसारखी पसरू लागली. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यापासून, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी पसरत होती, तेव्हा त्याच्या पीआरओने सांगितले की, अभिनेत्याने कोरोना चाचणी केली होती, पण ती निगेटिव्ह आली. मात्र, बुधवारी (१४ एप्रिल) स्वत: निरहुआने याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “मीसुद्धा पॉझिटिव्ह झालो आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!

-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

-कोरोनामुळे स्टेज शो न करणाऱ्या खेसारी लाल यादवच्या गाण्याचा नवा विक्रम, दोन दिवसांतच मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा