Saturday, December 7, 2024
Home भोजपूरी अक्षरा सिंगचे रोमँटिक गाणे ‘अखियां घायल करे’ रिलीज, अभिनेत्रीची स्टाइल पाहून चाहते थक्क

अक्षरा सिंगचे रोमँटिक गाणे ‘अखियां घायल करे’ रिलीज, अभिनेत्रीची स्टाइल पाहून चाहते थक्क

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग प्रत्येक वेळी आपल्या गाण्यांनी आणि अभिनयाने लोकांची मने जिंकते. तिने इंडस्ट्रीला खूप दमदार गाणे दिली आहेत, ज्यानंतर ती आता ‘अखियो घायल करे’ मधून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी परतली आहे.

अभिनेत्री अक्षरा सिंगचे ‘अखियाे घायल करे’ हे गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये ती तिच्या प्रियकराचे कौतुक करताना दिसत आहे. अक्षराचे हे रोमँटिक गाणे तिच्या चाहत्यांना आणि भोजपुरी संगीतप्रेमींना खूप आवडले आहे, ज्यामुळे चाहते व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ‘अखिया घायल करे’ हे गाणे अक्षरा सिंगच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीज करण्यात आले आहे.

या सगळ्यात गीतकार मनोज मतलबी आणि संगीतकार घुंगरू जी यांच्यासोबत अक्षरा सिंगची केमिस्ट्री भोजपुरी संगीत क्षेत्रात पुन्हा एकदा धुमाकूळ घालत आहे. या तिघांनी मिळून एकापेक्षा एक गाणी तयार केली आहेत. अशात या गाण्याबाबत अक्षरा सिंह म्हणाली की, हे गाणे रोमँटिक आहे.

ती पुढे म्हणाली, “एक कलाकार म्हणून मी सर्व प्रकारची गाणी घेऊन येते. कारण, लोकांचे मनोरंजन करायला मला फार आवडते. भोजपुरी संगीत आज झपाट्याने वाढत आहे, ज्यामध्ये कलाकारांसोबतच श्रोत्यांचेही योगदान समान आहे. मला भोजपुरीतील उत्तमोत्तम गाणी आणि प्रोजेक्ट्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे आणि या दिशेने मी माझ्या चाहत्यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने पुढे जात आहे.”

अक्षरा सिंगची बॅक टू बॅक धमाकेदार गाणी भोजपुरी संगीत क्षेत्रासाठी प्रभावी ठरत आहेत. अक्षराचे नुकतेच रिलीज झालेले हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. त्यांनी अभिनेत्रीच्या गायकीचे कौतुक केले आहे. यासोबतच चाहत्यांनी अभिनेत्रीला खेसारी लाल यादवसोबत पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.(bhojpuri singer akshara singh new song akhiyan ghayal kare released)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! कार्तिक अन् कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

कॅन्सरचे निदान झाल्याच्या बातम्यांवरून चिरंजीवी संतापले मीडियावर, जाणून घ्या काय म्हणाले अभिनेता

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा