राडाच ना! अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे रिलीझ; काही तासातच मिळाले हजारो हिट्स


दीमध्ये देखील एवढे गाणे प्रदर्शित होत नसतील, कदाचित जेवढे भोजपुरीमध्ये होतात. रोज एकतरी लहान मोठे गाणे प्रदर्शित झालेच पाहिजे असा अलिखित नियमच जणू भोजपुरीमध्ये आलाय असे वाटते. एवढे गाणे प्रदर्शित होऊनही प्रत्येक गाण्याला रसिकांकडून भरभरून प्रेम मिळते. उडत्या चालीची ही गाणी अगदी सहज प्रेक्षकांच्या तोंडात बसतात आणि हिट होतात.

नुकतेच भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असणाऱ्या अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन ‘लेन देन के चक्कर’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अंतरा सिंग भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये खूपच जास्त लोकप्रिय आहे. लोकं नेहमीच तिच्या गाण्यांसाठी उत्साही असतात. आता अंतराचे नुकतेच आलेले हे गाणे देखील अगदी कमी वेळात हिट झाले आहे.

हे गाणे नव भोजपुरी या यूट्यूबवर चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. अगदी कमी वेळात या गाण्याने हजारो व्ह्यूज मिळवले असून सोबतच प्रेक्षक कमेंट्स करून गाणे आवडल्याचे सांगत आहेत. सोशल मीडियावरही गाणे व्हायरल होत आहे. या गाण्यात दोन प्रेम करणाऱ्या जोड्यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या घरच्यांना लागते आणि ते प्रेमी जोडप्याच्या भेटण्यावर निर्बंध आणतात. अतिशय भावनिक असलेल्या या गाण्याला अंतरा सिंग प्रियांकाने अतिशय वेगळ्या अंदाजामध्ये गायले आहेत.

या गाण्यातील अभिनेत्रीला ग्लॅमरस दाखवले गेले आहे. हे गाणे हरेराम डेंजर यांनी लिहिले असून, रोशन सिंग यांनी या गाण्याला संगीत दिले आहे, तर रवी पंडित यांनी गाणे दिग्दर्शित केले आहे.

अंतरा सिंग प्रियांका ही भोजपुरीमधली रॉकिंग सिंगर आहे. तिचे काही दिवसांपूर्वीच ‘चली रहिया शहर बाजार हिलेला’ प्रदर्शित झाले होते. हे गाणे सुपरडुपर हिट झाले. ‘मरब लटक के’ या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.