बिकिनी टॉपमध्ये नोराचा मादक डान्स; मुव्हज अन् एक्सप्रेशन्स पाहून चाहते घायाळ


सर्वांसाठी खुल्या असलेल्या बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे वेगळ्या देशातून हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आले आहेत. यातले एकही कलाकार हिट झाले, तर काही फ्लॉप. अगदी हेलनजींपासून ते आताच्या कॅटरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिसपर्यंत अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. या सर्वानी त्यांच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर हिंदी चित्रपटांमध्ये नाव कमावले आहे. यातलेच एक नाव म्हणजे नोरा फतेही. मूळची कॅनडाची असणाऱ्या नोराने भारतात येऊन कठोर मेहनतीने आणि चिकाटीने तिच्या डान्सने अमाप लोकप्रियता मिळवली.

नोरा तिच्या जबरदस्त डान्ससाठी आणि मादक अदांसाठी ओळखली जाते. ती तिच्या डान्सने तर प्रेखकांचे मनोरंजन करतेच. सोबतच ती तिच्या सोशल मीडियावरील मजेशीर, हटके व्हिडिओ आणि फोटोंमधून देखील सर्वांचे मनोरंजन करते. नोरा पुन्हा एकदा तिच्या नवीन व्हिडिओमुळे लाईमलाईट्मधे आली आहे. नोराने नुकताच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये नोरा इंग्रजी गाणे आणि प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर असलेल्या ड्रेकच्या ‘वन डान्स’वर धमाकेदार डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये नोराने बिकिनी टॉप आणि हॉट शॉर्ट्स घातले असून तिच्या मादक मुव्हज आणि आकर्षक एक्सप्रेशन चाहत्यांना घायाळ करत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिले की, “समर टाईम वाईब्स, बॅक अप एँड वाईन इट.” नोराच्या या व्हिडिओला आतापर्यंत १८ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, तिच्या हा हॉट डान्स व्हिडिओ फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

नोराने २०१४ साली तिच्या करिअरची सुरवात केली. अनेक हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये नोराने डान्स नंबर्स केले आहे. मात्र, तिला खरी ओळख आणि खरी प्रसिद्धी मिळाली ती जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ सिनेमातील ‘दिलबर’ या गाण्याने. हे गाणे तुफान गाजले आणि या गाण्याने अनेक रेकॉर्ड तयार केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज नोरा डान्समध्ये एक ब्रँड समजली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.