बहिणींची शानदार केमिस्ट्री! वर्कआऊटदरम्यान जान्हवीने ओढला खुशीचा पाय; पाहा त्यांचा हा क्यूट व्हिडिओ


दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांच्यानंतर आता त्यांच्या मुलीही बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाल्या आहेत. यातील एका मुलीने आधीच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले आहे. ती म्हणजे जान्हवी कपूर होय. जान्हवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. अशातच आता तिचे पुन्हा चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे. ती तिची बहीण खुशी कपूरसोबत जिममध्ये मस्ती करताना दिसत आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन बहिणींची शानदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (Actress Janhvi And Her Sister Khushi Kapoor Were Seen Having Fun During Workout Watch Video)

जान्हवीचा हा व्हिडिओ एका फॅन पेजने शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, जान्हवीने लाल आणि जांभळ्या रंगाचे वर्कआऊट कपडे घातले आहेत, तर खुशीने राखाडी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची लेगिंग घातली आहे. वर्कआऊटदरम्यान जान्हवी खुशीला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तिचा पाय ओढत आहे. यादरम्यान खुशी न हसण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हिडिओवर जान्हवी आणि खुशीचे चाहते जोरदार आपले रिऍक्शन देत आहेत. व्हिडिओत त्यांची ट्रेनर नम्रता पुरोहितही दिसत आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे.

जान्हवी कपूरचा आतापर्यंतच्या कारकिर्दीवर एक नजर
जान्हवीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१८ मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. हा मराठी चित्रपट ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. यानंतर जान्हवी ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ आणि ‘रूही’ यांसारख्या चित्रपटात दिसली आहे.

आता लवकरच ती ‘दोस्ताना २’मध्येही झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त राज बब्बर आणि किरन खेर यांसारख्या दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे.

दुसरीकडे खुशी कपूरबाबत बोलायचं झालं, तर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. मात्र, ती नेहमीच आपल्या बहिणीसोबत स्पॉट होते. सोशल मीडियावरही दोघींचा चांगलाच वावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.