Saturday, March 22, 2025
Home भोजपूरी भोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात केला यूट्यूबवर राडा

भोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात केला यूट्यूबवर राडा

अंतरा सिंग प्रियांका ही भोजपुरीमधील एक लोकप्रिय गायिका आहे. तिची प्रत्येक गाणी प्रसिद्ध होत असतात. भोजपुरी प्रेक्षक देखील तिच्या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. ती तिच्या गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. आता तिचे हे गाणे देखील खूप व्हायरल होत आहे. (Bhojpuri singer Antara singh Priyanka’s new song release on YouTube)

अंतरा सिंगचे ‘ननदो पिस द हरदिया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे वेब म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर 20 जूनला प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला एका दिवसातच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तिने केवळ हे गाणे गायले नाही, तर या गाण्यात तिच्या अदा पाहून तिचे चाहते दीवाने झाले आहेत. तिचे खूप फॅन फॉलोवर्स आहेत. तिचे चाहते तिचे प्रत्येक गाण्याला भरभरून प्रतिसाद देत असतात. या गाण्याला आतापर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या गाण्यात भोजपुरी अभिनेत्री पल्लवी गिरी देखील दिसत आहे. ती या गाण्यात खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. अर्जुन शर्माने या गाण्याचे बोल लिहिले आहे. रोशन सिंगने या गाण्याला संगीत दिले आहे. रवी‌ पंडित हे व्हिडिओ दिग्दर्शक आहेत.

‘ननदो पिस द हरदिया’ या गाण्याच्या आधी अंतरा सिंग प्रियांकाचे ‘गन्ने के खेत मे मजा लीजिये’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यातील अंतराचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता. या गाण्यात एका प्रेमवीरांचा शेतात रोमान्स दाखवला होता. स्पीड रेकॉर्डस भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले होते, तेव्हा देखील प्रेक्षकांनी या गाण्याला जोरदार प्रतिसाद दिला होता.

अंतरा सिंग प्रियांकाची सगळीच गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. अंतरा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा