Friday, March 29, 2024

खेसारी लाल यादवला होणार अटक? ‘या’ कारणामुळे कोर्टाने केले अजामीनपात्र वॉरंट जारी

भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. छपरा कोर्टाचे प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्यांसहित विशेष न्यायिक दंडाधिकारी संजय कुमार सरोज यांनी खेसारी लाल विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ही घटना रसूलपूर ठाणा कांड संख्या १२०/१९ च्या एनआई ऍक्ट २४१/२१ सोबत जोडलेली आहे. त्याने २०१९ मध्ये एका ठिकाणची जमीन खरेदी-विक्री केली होती. त्या प्रकरणी आता त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खरेदी केलेली जमीन विकण्यासाठी खेसारी लालची पत्नी चंदादेवीसोबत २२ लाख ७ हजार रुपयांची बोलणी झाली होती. त्याचे रजिस्ट्रेशन ४ जून, २०१९ रोजी एका रजिस्ट्रेशन कार्यालयात झाले होते. खेसारी लालने १८ लाख रुपयांचा चेक दिला होता, जो त्याने २० जून, २०१९ मध्ये त्याच्या खात्यात जमा केला होता, परंतु तो चेक २४ जून रोजी परत आला. त्याने २७ जून रोजी तो चेक पुन्हा एकदा जमा केला, तेव्हा बँकेने २८ जून, २०१९ ला चेक बाऊन्स झाल्याची बातमी दिली. त्यानंतर त्याने प्राथमिक कारवाई केली.

पोलिसांनी २२ ऑगस्ट २०२० रोजी आरोप पात्र स्वीकारले न्यायालयाने २२ जानेवारी, २०२१ रोजी खेसारी लाल यादव विरोधात आदेश पाठवला. त्याला २५ जानेवारी, २०२१ रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो त्यावेळी उपस्थित राहिला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

खेसारी लाल हा भोजपुरीमधील एक लोकप्रिय गायक आहे. त्याने अनेक गाणी गायली आहेत. त्याच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षक खूप प्रतिसाद देत असतात. त्याने ‘बस कर पगली’, ‘सज के सवर के’, ‘जुदाई’, ‘अपनी तो जैसे तैसे’ यांसारखी गाणी गेली आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा